Kalyan

डाॅ. निता पाटील फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

डाॅ. निता पाटील फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार सोहळा
उत्साहात संपन्न

राहुल खरात

कल्याण- प्रतिनिधी -राज्यभरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा सन्मान व्हावा या उद्देशाने डाॅ.निता पाटील फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नुकताच कल्याण येथील महिला मंडळ हाॅल मध्ये करण्यात आले होते. महाराष्ट्रातुन ४० महिलांना राजमाता जिजाऊ गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातुन ९५ प्रस्ताव संस्थस प्राप्त झाले होते.त्यातून ४० प्रस्तावांची निवड करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शांती नगर पोलीस ठाणे भिवंडीच्या पोलिस इंस्पेक्टर सौ.ममताताई लाॅरेन्स डिसुझा, कल्याणच्या नायब तहसीलदार सौ.सुषमाताई बांगर, जिजाऊ ब्रिगेडच्या कोकण मुंबई अध्यक्षा सौ.विद्याताई गडाख उपस्थित होत्या. राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन सौ.विद्याताई गडाख यांनी जिजाऊ वंदना म्हणून कार्यक्रमाची सुरूवात केली. शिवव्याख्याती भक्ती फर्डे यांनी तलवारीच्या पात्याप्रमाणे धारदार भाषाशैलीत राजमाता जिजाऊ यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान दिले. त्यांच्या व्याख्यानाने सभागृहात जबरदस्त उत्साह संचारला. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून’खारी’बिस्कीट फेम वेदश्री खाडिलकर आणि विठु माऊली मालिकेतील आऊबाई फेम जान्हवी हाटे या दोन कलाकार सहकुटुंब उपस्थित होत्या.या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सर्व सदस्यांनी खूप मोलाचे सहकार्य केले. सौ.दीपा गर्गे, दीपाली भालेराव, मनिषा गांगुर्डे, अनुराधा रासने,योगिता खारोडे, माधुरी घुले, यश भोईर, आर्यन पाटील, सुप्रिया आचरेकर, मनिषा माने, सुनिता राठोड, निकीता भोईर, भूषण शाक्यवीर, सागर खारोडे,, मच्छिंद्र कांबळे, शिवश्री प्रभाकरजी भोईर या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेच्या कार्यक्रमांची व उपक्रमांची व्याप्ती बघुन पनवेल येथील संस्थेचे शुभचिंतक श्री.विनायक जोशी यांनी संस्थेस दहा हजार रुपयांची देणगी दीली.फाऊंडेशनच्या अध्यक्षा डाॅ. निता पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्था राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहीती दीली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डाॅ. अमितकुमार गोविलकर यांनी उत्कृष्टरित्या केले.कार्यक्रमासाठी हेमलता चिंबुळकर व डाॅ. हीना मुलपानी यांचे विशेष सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button