Amalner

मुडी प्र डा येथील पांझरा नदीवरील केटीवेअरची 47 लाख निधीतून होणार दुरुस्ती

मुडी प्र डा येथील पांझरा नदीवरील केटीवेअरची 47 लाख निधीतून होणार दुरुस्ती
आ.चौधरींच्या हस्ते झाले भूमिपूजन,अनेक गावांना मिळणार संजीवनी,अनेक कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण

मुडी प्र डा येथील पांझरा नदीवरील केटीवेअरची 47 लाख निधीतून होणार दुरुस्ती

अमळनेर  तालुक्यातील मुडी प्र. डा. येथील पांझरा नदीवर के टी वेअर दुरुस्ती साठी आ.शिरीष चौधरींच्या प्रयत्नातून  47 लाख 50 हजार निधी मंजूर झाल्याने या कामाचे भूमिपूजन आ.चौधरींच्या हस्ते करण्यात आले.याव्यतिरिक्त याच गावात इतर भरीव विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण देखील करण्यात आले.
          हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद्र चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला,आमदारांसह डॉ चौधरींचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले.याप्रसंगी गोमाता मंदिर परिसरात पेव्हरब्लॉक 5 लाख, स्मशानभूमी 15 लाख, काँक्रीट गटार 10 लाख, मुडी ते लोण 5.6किमी रस्ता डांबरीकरण 2 कोटी 39 लाख  आदी कामांचे भूमिपूजन तसेच  सामाजिक सभागृह 7 लाख , आर ओ प्लांट 6 लाख आदी कामांचे लोकार्पण करण्यात आले.पांझरा नदीवर मुडी वालखेडा दरम्यान असलेला केटी वेअर बंधारा नादुरुस्त झाल्याने परिसरातील गावांमध्ये पाण्याची चणचण निर्माण झाली होती,आ चौधरींनी याकडे विशेष लक्ष घातल्याने या केटीवेअर दुरुस्तीसाठी आमदार स्थानिक विकास निधी मंजूर झाला आहे,या दुरुस्ती मुळे मुडी, कंचनपूर , मांडळ , वालखेडा, भरवस, लोण सिम लोण चारम, लोण बुद्रुक, लोण खुर्द तसेच परिसरातील गावांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी मोठा फायदा होणार आहे. या सोबत भविष्यात राबविण्याल्या जाणाऱ्या पाणी पुरवठा योजनासाठी हा बंधारा वरदान ठरणार आहे. 
धरणाच्या नावाने विरोधकांचे राजकारण-आ.चौधरीं
            
          यावेळी आ.शिरीष चौधरी आपल्या मनोगतात म्हणाले की विरोधक आजही धरणाचे कामावरून राजकरण करित आहेत,मात्र आम्ही धरणाचा पाठपुरावा करीत असताना केवळ त्यावर अवलंबून न राहता,सिंचनासाठी लहान लहान प्रकल्पांना चालना दिली,एवढेच नव्हे तर हिरा उद्योग समूह आणि जलयुक्त शिवार योजनेतून अनेक नद्या व नाल्यांचे खोलीकरण केले त्याची फलश्रुती यंदाच्या पावसाळ्यात दिसत असून माझा मतदारसंघ जलयुक्त झाल्याचे समाधान मला आहे .काही लोकप्रतिनिधीनी फाफोरे धरणाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळू नये यासाठी चक्क जिल्हाधिकारी यांना पत्र देवून अडथळा आणत आहे,परंतु आम्ही खंबीर असल्याने त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाहीत,तसेच भविष्यात भरवस रस्त्यावर नाबार्ड च्या माध्यमातून पाझरा नदीवर मोठा फुल बांधण्याचे आमचे नियोजन असून हा पूल दळण वळण साठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे .याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कडे पाठपुरवा सुरू असल्याचे त्यांनी सांगत,खरच माझ्या कामांनी तुम्ही समाधानी असाल तर खंबीर साथ द्या आवाहन त्यांनी जनतेला केले.
            
           या प्रसंगी हिरा उद्योग समूह चेअरमन डॉ रवींद्र चौधरी, आरिफ भाया, अंकिता पाटील यानीही मनोगत व्यक्त केले, यावेळी मुडी उपसरपंच नारायण सूर्यवंशी, माजी प स सभापती चंद्रसेन पाटील, विकासो माजी चेअरमन हेमंत पाटील, रामचंद्र पाटील, नाना चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विश्वासराव पाटील,गटनेते प्रवीण पाठक, श्रीराम चौधरी, आरिफ भाया, किरण गोसावी, नगरसेवक बाळासाहेब सदांनशिव, धनंजय महाजन, पंकज चौधरी, सुनील भामरे, दगडू पाटील,तसेच बोर्दडे सरपंच सुनंदा चौधरी,भरवस सरपंच अशोक पाटील,लोण बु सरपंच समाधान पाटील, लोण खुर्द  सरपंच अशोक पाटील, माजी सरपंच सावखेडे राजेंद्र पाटील,लोण सिम माजी सरपंच कु अंकिता पाटील, मा सरपंच बोर्दडे संतोष चौधरी, मा सरपंच मांडळ नारायण कोळी, गजु महाराज, सुरेखा पाटील, वैशाली ठाकरे, अविनाश पाटील, उपसरपंच लोणसीम सोनू पाटील, राजेंद्र महाजन, बापू बडगुजर, शरद महाजन,गुलाबराव महाजन, संजय सोनवणे, सुदाम चौधरी, रमेश पाटील, हिरामण पाटील, प्रफुल चौधरी, योगेश पाटील, नवल पाटील,योगेश सोनवणे,सुभाष पाटील, उत्तम वानखेडे, मीना भिल, प्रदीप पाटील, किशोर सोनवणे,भानुदास पाटील, संजीव पाटील, छोटू सोनवणे,
सीताराम भिल, शिवाजी भिल, भगवान कोळी, जिजाब कोळी,
दादाराम पाटील, बाळा सोनवणे, ग्रामस्थ व महालक्ष्मी ग्रुप मित्र मंडळ  उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button