Amalner

?️अमळनेर कट्टा..रेशन भ्रष्टाचार…गहू आणि तांदुळाच्या गोण्यांनी भरलेली आयसर जप्त..आठवड्यात दुसरी कारवाई…रेशन माफियांचा काळा बाजार..!

?️अमळनेर कट्टा..रेशन भ्रष्टाचार…गहू आणि तांदुळाच्या गोण्यांनी भरलेली आयसर जप्त..आठवड्यात दुसरी कारवाई…रेशन माफियांचा काळा बाजार..!

अमळनेर येथील बालेमिया जवळ रेशनचे गहू तांदूळ घेऊन जाणारी गाडी क्र MH 19 BN 8838 नं असलेले हे वाहन माल भरत असतांना एपीआय राकेशसिंह परदेशी, हे कॉ भटूसिंग तोमर,हे कॉ दिपक विसावे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सदर वाहन चालकास थांबवून विचारले असता संशयास्पद आढळून आल्याने चौकशी केली.हे वाहन सर्व तांदूळ व गहू घेऊन मार्केट ला घेऊन जात असल्याचे वाहन चालकाने सांगितले आहे. एपीआय परदेशी,भटूसिंग तोमर,आणि दिपक विसावे यांनी महसूल अधिकारी यांना कळविले व सदर वाहन तहसील कार्यालयात आणले.येथे नायब तहसीलदार संतोष बावणे यांनी पंचनामा केला व वाहन पुढील कार्यवाही साठी पोलीस ठाण्यात रवाना केले आहे. सदर वाहन दिलीप डेरे यांच्या मालकीचे असून वाहन चालक विनोद दिपा घोलप हे आहेत.वाहनात अवैध रित्या घेऊन जात असलेले साधारण पणे 55 क्विंटल धान्य असून 112 गोण्या आहेत.

सदर कार्यवाही एपीआय राकेशसिंह परदेशी, हे कॉ भटूसिंग तोमर,हे कॉ दिपक विसावे यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button