sawada

सावदा पालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न । 2 विषय तहकूब तर 14 विषयांना मंजूरी..

सावदा पालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न । 2 विषय तहकूब तर 14 विषयांना मंजूरी..

युसूफ शाह सावदा

सावदा : सावदा पालिकेची सर्वसाधारण सभा दी 21 रोजी ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ अनिता येवले या होत्या, सभेस नगरसेवक, नगरसेविका तथा मुख्याधिकारी सौरभ जोशी उपस्थितीत होते
सभेसमोर ऐकून 16 विषय मांडण्यात आले होते, यापैकी विषय क्रमांक 5 घनकचरा प्रकल्पास संरक्षक भीत उभारणे तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर संकुलाचे फेस टू मधील वरील मजल्याचे बांधकाम करणे या दोन विषयावर चर्चा सुरु असताना नगरसेवक राजेश वानखेडे यांनी सदर दोन्हीं विषया बाबतीत सदर कामाचे अगोदर इस्टिमेट तयार करा ते सभेसमोर मांडा मगच त्यास परवानगी दया असे म्हणणे मांडले आमचा विकास कमाना विरोध नाही तथापि सदर विषया बाबतीत सभे समोर अगोदर इस्टिमेट सह विषय ठेवा अशी मागणी केल्याने सदर विषय या सभे साठी तहकूब ठेवण्यात आले, आता हे दोन्ही विषय पुढील सभेत इस्टिमेट सह पुन्हा ठेवण्यात येतील,
या सभेत शहरातील दिव्यांग बांधवाना 5% निधि वाटप बाबत मंजूरी मिळाली यामुळे शहरातील सुमारे 197 दिव्यांग बंधवाना त्यांचे दिव्यांगत्वाचे टक्के वारीनुसार आर्थिक मदत वाटप करण्यात येईल, ओम कॉलनी मधील पालिकेच्या ओपनस्पेसवर क्लब हॉलचे बांधकाम करणे, जलकुंभ बांधकामा साठी माहाराष्ट्र जीवन प्राधिकरणास ना हरकत देणे, थोरगव्हाण रस्त्यावर गटारी बांधणे, पालिका ईमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे यासह बाकी विषयाना मात्र सभेत मंजूरी देण्यात आली, कामकजात पालिका कर्मचारी यानी देखील सहकार्य केले,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button