Amalner

Amalner: लायन्स क्लब तर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

लायन्स क्लब तर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

अमळनेर येथील लायन्स क्लबचे अध्यक्ष योगेश मुंडे यांनी एक जुलैपासून क्लबच्या अध्यक्षपदाचा पदभार सांभाळला आहे. आज पावेतो साधारणतः त्यांच्या महिनाभराच्या कार्यकालात ७ गरजू रुग्णांच्या मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अत्यंत माफक दरात डॉ. राहुल मुठे यांनी ही सेवा दिली आहे .त्यासाठी सामाजिक जाणीवेचे उचित भान असलेल्या काही दात्यांनी भरीव अर्थसहाय्य केले आहे. वर्षभर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी गरजूंनी श्री. मुंदडे व प्रोजेक्ट चेअरमन एमजेएफ विनोद अग्रवाल यांच्याशी संपर्क साधावा. तर दात्यांनी या उपक्रमासाठी भरीव आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन क्लब तर्फे करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button