फैजपूर शहरातील रहिवासी कल्पेश सुरेश बाणाईत दुचाकीवरून घसरले जखमी अवस्थेत पडलेला तरुणांच्या सतर्कतेमुळे जिवदान
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : फैजपूर शहरातील श्रीकृष्ण नगरातील रहिवासी कल्पेश सुरेश बाणाईत (वय २८) हा तरुण शनिवारी रात्री आपल्या मित्राला भुसावळ रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी गेला होता. रात्री १२ वाजता तो भुसावळातून घरी परत येत होता. आमोदा गावाजवळ त्याच्यामागे कुत्रे लागले. त्यामुळे दुचाकी अनियंत्रित होऊन तो रस्त्याच्या कडेला फेकला गेला. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर दुखापत होऊन तो बेशुद्ध पडला. त्याचवेळी रात्री १२ वाजेला सावदा येथून रूग्ण घेऊन १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका जात होती. चालक ललीत खैरे रुग्णवाहिका चालवत होते. त्यांना रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत युवक पडलेला दिसला. त्यामुळे खैरे यांनी रूग्णवाहिका थांबवून रूग्णवाहिकेतील डॉ. एजाज शेख यांच्या मदतीने जखमीला रुग्णवाहिकेत घेतले. त्याला डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तात्काळ उपचार सुरू झाल्याने जखमीची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
रुग्णवाहिका चालक ललित खैरे यांच्या फैजपूरचे नगरसेवक अमोल निंबाळे, माजी नगरसेवक संजय रल, जेष्ठ नागरिक अध्यक्ष रमेश चौधरी, तालुका सरचिटणीस अजय मेढे, यावल तालुका काँग्रेस सचिव जगदीश धांडे, प्रकाश सोनवणे, सागर सपकाळे यांनी खैरे यांच्या कार्याचे कौतुक करून सत्कार केला.






