कळंब तालुका भाजपच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निम्मित अभिवादन
प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
आज दिनांक 3/6/2020 रोजी बुधवारी म्हणजे 3 जून रोजी गोपीनाथ मुंडेंचा सहावा स्मृतिदिन आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात.
गोपीनाथ गडावर साध्या पद्धतीने मोजक्या लोकांमध्ये गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी कार्यक्रम होणार आहे. पुण्यतिथीचा कार्यक्रम सोशल मीडियाद्वारे लाईव्ह होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी किंवा मला भेटण्यासाठी येऊ नका, असा संदेश पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता.
याच विनंतीला मान देत कळंब तालुका भारतीय जनता पाटीं च्या वतीने लोकनेते स्व गोपीनाथराव मुंडे यांची 6 वी पुण्यस्थिती प्रतिमा पुजन व आभिवादन करून साजरी करण्यात आली.
यावेळी तालुका अध्यक्ष प्रा दिलीप पाटील ,भाजपचे नेते आजित पिगळे, तालुका सरचिटणीस संजय जाधवर तालुका ,जिल्हा चिटणीस मिनाज शेख, अनुसुचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष सतपाल बनसोडे, उप अध्यक्ष शिवाजी गिड्डे , शहर अध्यक्ष संदीप बाविकर ,माणिक बोंदर ,प्रशांत लोमटे शितल चोंदे ,
बाळासाहेब खोसे बंटी चोंदे ,राजेंद्र टोपे, सुनिल जोशी आदी उपस्थित होते..






