केंद्र शासनाच्या नीती आयोगाचे CEO मा. अमिताभ कांत यांनी आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमांची आढावा भेट..लोक संघर्ष मोर्चा च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा
नंदुरबार
आज नंदुरबार जिल्ह्याला केंद्र शासनाच्या नीती आयोगाचे CEO मा. अमिताभ कांत यांनी आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी भेट दिली त्यावेळी लोक संघर्ष मोर्च्याच्या वतीने प्रतिभा शिंदे व गणेश पराडके यांनी जिल्ह्यातील विकासा संदर्भातील समस्या मांडण्यासाठी त्यांची भेट घेतली यावेळी खासदार मा. हिना गावित,जिल्हाधिकारी श्री भारुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गौडा हे ही उपस्थित होते
या वेळी
1)जिल्ह्यातील रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबण्यासाठी सी एफ आर च्या माध्यमातून ज्या गावांना सामूहिक वनहक्क मिळाले आहेत त्यांच्या माध्यमातून स्थानिक रोजगारासाठी नियोजन करण्यात यावे
2) तोरणमाळ ग्रामपंच्यायत मधील गावांच्या सामूहिक वन व्यवस्थापन समितींच्या माध्य मातून पर्यटन स्थळ विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा
3) नर्मदेतून मिळालेले 10 टी एम सी व तापीतून मिळालेले 5 टी एम सी पाणी उचलून अक्कलकुवा धडगांव शहादा व तळोदा तालुक्यातील सिंचन व पाण्याचा प्रश्न सोडवला जावा
4) आदिवासी जिल्हा म्हणून या जिल्ह्यात बाहेरून विविध स्वयंसेवी संस्था येत असतात यांच्या कामाचे जिल्ह्यातील अनुभवी कार्यकर्त्यांसह जिल्हा प्रशासनाने सनियंत्रण करावे
5) आकांक्षीत जिल्हा म्हणून या जिल्ह्यातील कुपोषण व स्थलांतराचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष पॅकेज तयार करून त्याची लोकसहभागातून अंमलबजावणी केली जावी
या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली तसेच जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने लोक संघर्ष मोर्चा या बाबतीत पुढाकार घेईल व या जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमी तत्पर राहील असेही या वेळी प्रतिभाताई यांनी सांगितले







