Amalner

नर्मदा मेडिकल फाउंडेशन तर्फे एक दिवसाचे अन्न वाटप

नर्मदा मेडिकल फाउंडेशन तर्फे एक दिवसाचे अन्न वाटप

अमळनेर योगेश पवार

लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर गोर गरीब लोकांना जेवण देण्यासाठी गोक्षेत्र प्रतिष्ठाण सोबत डॉ अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाउंडेशन ने पुढाकार घेत एक दिवसाचे अन्नदान केले.”कोरोना साथीत विशेषतः वृद्धांनी कोणताही आजार अंगावर न काढता त्वरित सरकारी दवाखान्यात संपर्क करावा ! असे आवाहन यावेळी डॉ अनिल शिंदे यांनी लोकांना कोरोनाबाबत जाहिर मार्गदर्शन करतांना केले.
कोरोना मुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत अमळनेर शहरातील मोल मजुरी करणाऱ्यांवर लॉक डाऊन काळात उपासमारीची वेळ आलेली असतानाच हजारो लोकांना अन्नदानासाठी पुढे सरसावल्या वर्धमान संस्कार धाम,गोक्षेत्र प्रतिष्ठाण च्या भानूबेन शाह गोशाळेच्या मदतीस डॉ अनिल शिंदे,सौ.दिपाली शिंदे,डॉ.संदिप जोशी,डॉ.सौ.मयुरी जोशी यांचे नर्मदा मेडिकल फाउंडेशन ने एक दिवसाचा अन्नदानासाठी पुढाकार घेतला.

रुबजी नगर येथील अन्नक्षेत्र केंद्रावर डॉ.अनिल शिंदे यांनी सपत्नीक स्वहस्ते अन्नदान केले.याप्रसंगी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे,मा.नगरसेवक संदिप घोरपडे,रणजित शिंदे,सुभाष भोई आदि उपस्थित होते. दिवसेंदिवस अन्नदानासाठी शहराच्या विविध भागांतील गरजुं कुटुंबातील लोकांची संख्या वाढतच चालली आहे .अश्या वेळी शहरातील दाते गोशाळेतर्फे सुरू असलेल्या या अन्नक्षेत्र समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होऊन योगदान देत असल्याने या संकटकाळी गोरगरिबांच्या जेवणाची सोय होत आहे विविध क्षेत्रातील दात्यांनी असेच पुढाकार घेऊन अन्नदानासाठी सहकार्य करत रहावे असे गोशाळेतर्फे चेतन शाह,राजू सेठ,प्रा.अशोक पवार ,महेंद्र पाटिल, डी ए धनगर यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button