Faijpur

जळगाव येथील आर्थिक दुर्बल महिलेस मिळाला स्वयंरोजगार

जळगाव येथील आर्थिक दुर्बल महिलेस मिळाला स्वयंरोजगार

World Sali Foundation – जागतिक साळी फाऊंडेशन, मुंबई चा अभिनव उपक्रम

येथे स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो हे ब्रिदवाक्य असलेल्या जागतिक साळी फाऊंडेशन या संस्थेने मुंबई येथे पार पडलेल्या संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनी जळगाव येथील ज्या महिलेच्या पतीचे केमिकल कंपनीच्या अपघाता मध्ये दुर्देवी निधन झाल्या मुळे त्यांच्या कुंटुबाच्या पुढील उदरनिर्वासाठी या महिलेचे दुसऱ्याच्या घरी जावून कामास जाणे बंद करुन या महिलेस आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने तिला दोन महिन्याच्या आत स्वत:चा उद्योग सुरु करुन देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. फाऊंडेशनने निर्धार केल्याप्रमाणे दोन महिन्याच्या आत या महिलेस रविवार दिनांक 9 फेब्रुवारी, 2020 रोजी “रिया लेस आणि साडी सेंटर” हे साडयांचे दुकान गुजराल पेट्रोल पपांसमोर प्रिप्रांळा, जळगाव येथे जागतिक साळी फाऊंडेशनच्या सहकार्याने सुरु करुन देण्यात आले.

सुरक्षित विश्वासाचे नाते जपणाची आपुलकीची माणसं अशी ओळख असलेल्या जागतिक साळी फाऊंडेशनचा हा कार्यक्रम जळगाव जिल्हयाचे जागतिक साळी फाऊंडेशनचे प्रमुख श्री.सुधिरभाऊ साळी व संपर्क प्रमुख श्री.दिलीप आखडकर यांनी आयोजित केला होता. या दुकानाचे उद्घाटन जळगाव जिल्हा साळी समाजाचे अध्यक्ष श्री.अशोक दिवटे, अमळनेर येथील उद्योगपती श्री.प्रतापशेठ वखारे, नगरसेवक श्री मयुर कापसे, जळगाव शहर अध्यक्ष श्री.राजूभाऊ खेडकर व या महिलेचे वडिल श्री.राजू मिरगे, बुऱ्हाणपूर चे अध्यक्ष श्री अशोक सातपुते यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिव्हेश्वर मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पलता रविंद्र साळी ह्या होत्या. कार्यक्रमासाठी फाऊंडेशनचे भुसावळ येथील विश्वस्त श्री.मयुर चव्हाण व फैजपूर येथील विश्वस्त सौ.मनिषा नंदलाल साळी उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी एरंडोल, अमळनेर, पारोळा, धरणगाव, नशिराबाद, जामनेर, भुसावळ, सावदा, फैजपूर, यावल, रावेर, बुऱ्हाणपूर येथील साळी समाजातील बंधू आणि भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन श्री पंडित साळी व श्री सुभाष आढाव यांनी केले. या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचे मंत्रालयातील अधिकारी व फाऊंडेशनचे संस्थापक श्री.विजय वक्ते यांनी उपस्थितांना फाऊंडेशनची माहिती दिली व अशा प्रकारे असहाय्य महिलांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्व उपस्थितांचे फाऊंडेशनच्या प्रमुख विश्वस्त सौ.निशा विजय वक्ते यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button