पति च्या वाढदिवसानिमित्त पूर्णाड येथील सरपंचांनी ऑक्सिजन पाईपलाईन साठी दिली आर्थिक मदत तहसीलदार यांच्याकडे धनादेश सुपूर्द
रजनीकांत पाटील
मुक्ताईनगर
तालुक्यातील पूर्णाड येथील महिला सरपंच प्राध्यापिका मनीषा देशमुख यांनी त्यांचे पती संदीप दिनकरराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या खर्चाला फाटा देत तोच पैसा मुक्ताईनगर येथील जिल्हा रुग्णालयात मध्ये अत्याधुनिक कोविड कक्ष तसेच व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन युक्त तयार होत असलेल्या कक्षासाठी आर्थिक मदत केली असून तहसीलदार शाम वाडकर यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.धनादेश देताना प्राध्यापिका मनीषा देशमुख यांच्यासमवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, संदीपराव देशमुख, विनायक वाडेकर, भुषण पाटील ,अभयसिंग देशमुख हे उपस्थित होते.
विशेष म्हणजे मागील आठवड्यात मुक्ताईनगर निमखेडी जिल्हा परिषद गटाचे जिप सदस्य निलेश पाटील यांनीदेखील आपल्या वाढदिवसानिमित्त अकरा हजार रुपयांचा धनादेश तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द केला होता.
