Kolhapur

माइंडफुलनेस एज्युकेशन, मुंबई ,सोशल सर्कल,कोल्हापूर व मन:शक्ती ” यांचे वतीने कार्यगौरव” पुरस्कार सोहळा 2021 पुणे येथे रंगणार

माइंडफुलनेस एज्युकेशन, मुंबई ,सोशल सर्कल,कोल्हापूर व मन:शक्ती ” यांचे वतीने कार्यगौरव” पुरस्कार सोहळा 2021 पुणे येथे रंगणार

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : माइंडफुलनेस एज्युकेशन चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने,समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती महत्त्वांचा “गौरव” सोहळा पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे.

माइंडफुलनेस एज्युकेशन चे संचालक-मा.राहुल दळवी,सहसंचालाक- कु.रूपाली शेंडे,मन:शक्तीचे संचालक- मा.समिप नागवेकर, सोशल सर्कल मल्टीपरपज सोसायटी कोल्हापूरच्या अध्यक्षा सुमित्रा भोसले माइंडफुलनेस एज्युकेशन सहकारी व सोशलचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष- मा.सुभाष भोसले, मा प्रशांत भोसले, मा संतोष चव्हाण, मा रोहीणी भोसले, मा प्राजक्ता चव्हाण,मा.तुकाराम पाटील,मा.शशिकांत कांबळे,मा.सुहास मस्के,सुनिल धनगर,मदन पिंगळे तसेच प्रमुख पाहुणे- डॉ.प्रविण पारगावकर,वास्तुविशारद- मा.रविराज अहिराव,स्प्रिच्युअल कोच – मा.शशिकांत खामकर,महाराष्ट्र पञकार संघ अध्यक्ष – मा.विलासराव कोळेकर,हर्ष अकॕडमीचे संचालक – कवी,मा.रवि बावडेकर ,पार्श्वगायीका- कु.सुप्रिया सोरटे तसेच अभिनेते,अभिनेञी व आमदार यांच्या शुभ हस्ते होणार आहे.

या चार वर्षात मन:शक्ती व माइंडफुलनेस एज्युकेशन, सोशल सर्कल, कोल्हापूरचे चे कार्य लाख मोलाचे ठरले आहे.महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अन्नदान उपक्रम,विद्यार्थ्यांना साहित्य वाटप,गोरगरिबांना भोजन साहित्य वाटप, महीलांचे सक्षमीकरण तसेच माइंडफुलनेस एज्युकेशन अंतर्गत विद्यार्थी विकास उपक्रमातून हजारो विद्यार्थ्यांना तणाव व्यवस्थापन,अभ्यास नियोजन प्रशिक्षण दिले जात आहे.सामाजिक महिला,वृध्दाश्रम मध्ये तणाव व्यवस्थापन,आत्मभान,सहिष्णूतावाढीसाठी कार्यक्रम घेतले जातात.तसेच सजग भारतीय ध्यान साधनेची ओळख जगभर करून व ध्यान साधनेवरती तणाव व्यवस्थापन एज्युकेशन निर्माण करून दुःख मुक्त,व्यसनमुक्त,स्वयं-प्रकाशमान विद्यार्थी घडवण्याचे कार्य हाती घेतले आहे.हे उद्दिष्ट ठेवूनच आम्ही “कार्यगौरव” पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे.जसा एखादा कुंभार मुर्ती मध्ये जीव ओततो.तसेच या महाराष्ट्राच्या मातीत शिक्षक,डॉक्टर,उद्योजक,थेरपिस्ट,मोटिव्हेशनल स्पिकर,सामाजिक कार्यकर्ते,सामाजिक संस्था कंपनी या मानवी मनुष्यामध्ये जीव ओतून त्यांना आकार देण्याचे कार्य करताना दिसतायत.हे कार्य असेच सदैव चालू रहाण्यासाठी कोणीना कोणीतरी कुसुमाग्रजांच्या कणा या कविते प्रमाणे पाठिवरती हात ठेवून लढ म्हणणार्या संस्थांची,व्यक्तींची गरज असते.हेच प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील दिग्गज व्यक्तीमत्वांना पुरस्कार देऊन सत्कार करण्याचे योजले आहे.यातून आम्हाला ही प्रेरणा व प्रोत्साहन मिळत राहिल.

आपल्या आतून झरा वाहतो निर्मळ माणूसकीचा..तयात भिजतो समाज अवघा व्याकुळ हो बाकिचा…कार्य घडावे असेच निरंतर तेजोमय सुर्यातून चराचरास दिशा मिळावी आपल्या कार्यातून

आपण आपले नॉमिनेशन पाठवून या “कार्यगौरव” पुरस्काराचे साक्षिदार बनावे असे प्रतिपादन मा.राहुल लता सिध्दार्थ दळवी. मा .सुमित्रा भोसले
यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button