Chalisgaon

देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आप्पांना पुन्हा निवडून आणा –खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आवाहन

देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आप्पांना पुन्हा निवडून आणा –खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आवाहन

लोहटार, बाळद नेरी येथील जाहीर सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद : खासदारांच्या अभ्यासपूर्ण भाषण

मनोज भोसले
लोहटार — गेल्या पाच वर्षांपासून राज्यात विकासाचा झंझावात सुरू असताना सर्वाधिक निधी आपल्या तालुक्यासाठी खेचून आणणारा आणि जनतेशी नाळ असलेले आमदार किशोर आप्पांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे. गेल्या पन्नास वर्षात राहिलेला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अतिशय प्रामाणिक काम करणारे राज्य सरकारने अधिकाधिक योजना अमलात आणल्या त्यातून गोरगरीब वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिक काम केले आहे. रस्ते,वीज,पाणी यासह शेतकरी शेतमजूर महिला सर्वांना न्याय देणारे शिवशाहीचे सरकार राज्यात पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी आपण महायुतीचे धडाडीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील निवडून आणा. असे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले ते आज पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार तथा भाजपा शिवसेना आर पी आय महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आज लोहटार , बाळद आणि नेरी येथे जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी खासदार उन्मेश पाटील बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, माजी सभापती सुभाष मुंडे पाटील, ओबीसींचे नेते अनिल भाऊ महाजन, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश बापू सोमवंशी ,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख एड. दिनकर बापू देवरे, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील, भाजप तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, शरद पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश पाटील, माजी अध्यक्ष कमलेश पाटील, माजी पस सदस्य डॉ.भरत पाटील, भाऊसाहेब पाटील, माजी उपसभापती रावसाहेब पाटील, रवींद्र सोमवंशी, पंचायत समिती सदस्य वसंत गायकवाड, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख धर्मराज पाटील, बशीर दादा पठाण, भाजप सरचिटणीस प्रदीप बापू पाटील, सरपंच बळीराम पाटील, उपसरपंच सुरेश पाटील, आनंद पाटील, बाळू निबाळकर, आर पी आय चे आर के पठाण, तसेच लोहटार, बाळद,नेरी येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या तिन्ही सभांना ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती.
अभ्यासपूर्ण भाषणाने सभा गाजल्या
खान्देश समृद्ध करायचा असल्याने येत्या पाच वर्षात नार पार आणि सात बालून बंधारे पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील असून या योजना प्रत्यक्षात साकार होण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण भरघोस यश दिले तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आणा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी युतीच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदान मेहनत घ्यावी अशी विनंती त्यांनी केली. विविध विषयांवरील खासदारांच्या अभ्यासपूर्ण भाषणा प्रसंगी वेळोवेळी प्रचंड टाळ्यांचा गजर होत होता. नेरी येथे अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button