अमरावती

महाराष्ट्र शासनाचा विद्यार्थांच्या जिवाशी खेळ आदिवासी विकासमंत्री झोप झाली असल तर यावप्रश्नाकडेही लक्ष द्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस

  • महाराष्ट्र शासनाचा विद्यार्थांच्या जिवाशी खेळ
  • आदिवासी विकासमंत्री झोप झाली असल तर यावप्रश्नाकडेही लक्ष द्या
  • आमरण उपोषणाचा चौथा दिवस
    महाराष्ट्र शासनाचा विद्यार्थांच्या जिवाशी खेळ आदिवासी विकासमंत्री झोप झाली असल तर यावप्रश्नाकडेही लक्ष द्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस

अमरावती प्रतिनिधी
आदिवासी मुला/मुलींचे शासकिय वसतीग्रुह अमरावती येथील विद्यार्थी आपल्या अनेक वर्षापासुन च्या नेहमीच्या मागणीसाठी विद्यार्थाी आमरण उपोषणावर आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालय अमरावती येथे बसले आहे परंतु आजचा चवथा दिवस असुनही प्रशासनाची मुजोरी कायम दिसत आहे विद्यार्थाचा जिवाशी खेळण्याचे काम हे शासन करत आहे विद्यार्थांच्या रास्त मागण्या आहे…. 
  •  रहाटगाव येथील मंजुर जागेवर वसतीग्रुह इमारतीचे बांधकाम त्वरीत करणे बाबत 
  •  3 वर्षाकरीता विद्यार्थासाठी MPSC/UPSC स्पर्धा परिक्षाचे क्लासेस चालु करणे बाबत
अश्या आणि इतर  मागण्यांसाठी संतोष बळी, अनिल मिराशे व अजय ढंगारे हे तीन विद्यार्थी आमरण उपोषण करण्यास बसले आहेत व वसतीग्रहातील हजारो विद्यार्थी त्यांना पाठींबा देण्यासाठी चवथ्या दिवशी कायम आहेत. मात्र शासन आणखी या मागण्यासाठी गंभीर झालेले दिसत नाही. एकिकडे शासन आदिवासींचा विकास करण्याच ठरवते मात्र तेच दुसरीकडे शिक्षणाच साधनच त्यांच्याकडुन हिरावुन घेते आपल्या आदिवासी लाचार आमदारांमुळे आज विद्यार्थ्यांना अशी उपोषणाची वेळ येत आहे. आदिवासी विकासमंत्री यांनी तसेच संबधीत अधिकारी यांनी या प्रश्नावर तोडगा काढावा व विद्यार्थाच्या मागण्या पुर्ण कराव्या विद्यार्थाच्या जीवाशी खेळण या शासनाला परवडणार नाही…

Leave a Reply

Back to top button