आदिवासी समाजातील सचिन देवराम लांडे यांची नायब तहसिलदार पदी नियुक्ती
प्रतिनिधी – दिलीप आंबवणे
वाई येथील सचिन देवराम लांडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे नायब तहसिलदार पदी नियुक्ती त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होतं आहे. सचिन यांचे मुळ गाव पुर शिरोली तालुका जुन्नर जिल्हा पुणे पण वडील वाई येथे नोकरीत असल्याने प्राथमिक शिक्षण हे महिला स्नेहसंवर्धक समाज प्राथमिक विद्यामंदिर माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल वाई, उच्च माध्यमिक शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय पुणे, तर अभिंयात्रिकी मधील पदवी शिक्षण सीओईपी, पुणे येथे झाले आहे एका सर्वसामान्य कुटूंबातील सचिनची स्पर्धा परिक्षांमधील गगनभरारी सध्याच्या युवा पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे. सचिनने युपीएससी ची परिक्षा दिली आहे.
एका आदिवासी भागातील हे कुटूंब नोकरी निमित्त शहरात येते आणि आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले त्यांचा फायदा उच्च पदावर नोकरी मिळवता आली. आपल्याला चांगले शिक्षण न मिळाल्याने चांगल्या पदाची नोकरी जरी मिळाली नाही पण आपले स्वप्न मुले पुर्ण करतात यासारखा आईवडील नातेवाईक समाजबांधव यांना आनंद होत आहे.







To aaj UPSC clear zala