Pandharpur

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

प्रतिनिधी
रफिक आतार

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे,फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.शरद पवार, अकॅडमिक डीन प्रा. टी. एन. जगताप, सर्व शाखांचे विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.तसेच, संस्थेच्या फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये देखील हा दिवस बालिका दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेचे संचालक श्री. दिनेश रुपनर यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पब्लिक स्कूलचे प्राचार्य सिकंदर पाटील, सहशिक्षिका शीतल बिडवे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी व कार्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. याकार्यकर्मासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button