Motha Waghoda

कोरोना महामारीत नागरिकांना बेरोजगारीचा फटका त्यातच कमीजादा वीजेचाही बसतोय झटका

कोरोना महामारीत नागरिकांना बेरोजगारीचा फटका त्यातच कमीजादा वीजेचाही बसतोय झटका

प्रतिनिधी मुबारक तडवी

मोठा वाघोदा गावातील नियमित होणार्या मात्र कमी जास्त दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे विद्यूत उपकरणे जळून नागरिकांच्या नुकसानीत दिवसे दिवस होतेय वाढ गावात सावदा,चिनावल ,मस्कावद सबस्टेशनवरुन विद्युत पुरवठा केला जातो मात्र गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून होणारा विद्युत पुरवठा हा कमीजादा दाबाचा होत असल्याने तसेच विद्युत पुरवठा ट्रीप होत असल्या कारणास्तव गावातील अनेक टिव्ही,एल ईडी, एलसीडी टीव्ही, फ्रिज,कुलर,पंखे,लाईट,कट आऊट ,बटनबोर्ड, इलेक्ट्रिक मोटार ,सबमर्सिबल पंप अशा अनेक इलेक्ट्रॉनिक व ईलेक्ट्रीकल उपकरणे जळून नादुरुस्त अथवा नष्ट होत असून नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यातण दुष्काळात तेरावा महिना दरमहा अंदाजित रिडींग नोंदलेल्या मिटर बिलांचा वरुन भुर्दंड आधीच ९ महिन्यांपासून कोरोना महामारी च्या संकटात होरपळलेल्या नागरिकांना अंदाजित वाढीव वीज बीलासह कमी-जास्त दाबाने विद्युत पुरवठ्यामुळे विद्यूत उपकरणे जळून होत असलेल्या नुकसानीचा ही तीव्र झटका बसत आहे तरी सावदा विद्युत महावितरण चे अभियंता यांनी जातीने लक्ष देवून मोठा वाघोदा गावात सुरळीत विद्युत पुरवठा होईल याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांसह गावकर्यातून होते आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button