Latur

लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेलचे संपादकांचे डोके ठिकाणावर आहे का

लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेलचे संपादकांचे डोके ठिकाणावर आहे का ??

लॉर्ड बुद्धा या नावाचा दुरूपयोग करू नये
भिम आर्मी जिल्हा सरचिटणीस यांचा इशारा

प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे

लोकवर्गणीतून चालू झालेल्या लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल हे तथागत गौतत बुद्ध महात्मा फुले छत्रपती शाहूमहाराज याचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्ती पर्यन्त पोहचवता येथील या उद्देशाने या चॅनलची स्थापना करून बहुजना पर्यन्त विचार पोहोचवले जात होते पण आज मितीस जेंव्हा हे चॅनेल चालवण्यासाठी पैसे कमी पडत होते तेव्हा बहुजन समाजाच्या लोकवर्गणीतून वर्गणी गोळा करून हे चॅनल फुले शाहू आंबेडकर यांचे विचार दाखवत होते पण कालांतराने याच चॅनेल वर पैसे कमावण्याच्या नादात आपल्या चॅनेलच्या नावाचा विसर पडलेला दिसून येत आहे महापुरुषांच्या विचार दाखवणे कमी व अंधश्रद्धा, राशी ,भविष्य अशा थोतांड गोष्टी दाखवून पैसे कमविण्या चा एक धंदा उघडलेला आहे तरी लॉर्ड बुद्धा चॅनेलच्या संपादकांनी लोकवर्गणीतून सुरू केलेल्या चॅनेल ला गालबोट लावू नये व ज्या उदेशातून या लॉर्ड बुद्धा चॅनेलचे स्थापना करण्या आली होती ती आता या चॅनेल वर दिसून येत नाही व अनावश्यक कार्यक्रम दाखवून फुले शाहू आंबेडकरी समाजाला हे थोतांड विचार धोकादायक असल्याने त्वरीत असे कार्यक्रम दाखवणे बंद करण्यात यावे असे व लॉर्ड बुद्धा चॅनेलच्या संपादकांनी गांभीर्याने लक्षात घ्यावे व लॉर्ड बुद्धा या नावाचा दुरुपयोग करूनये असे भिम आर्मीचे लातूर जिहा सरचिटणीस यांनी इशारा दिला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button