Maharashtra

हेमाडपाडा येथे PMGKY तांदूळ योजनेचे मोफत रेशन धान्य सोशल सिस्टन्स ठेवत प्रारंभ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

हेमाडपाडा येथे PMGKY तांदूळ योजनेचे मोफत रेशन धान्य सोशल सिस्टन्स ठेवत प्रारंभ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रतिनिधी दीपक भोहे

सुरगाणा: सध्या देशात कोविड -१९ या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशात लॉकडाऊन चा निर्णय लागू केला आहे. यामुळे गोरगरिबांची मोलमजुरी बंद असल्याने खाण्यापिण्याचे हाल झाले आहेत. गोरगरिबांचे हाल होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार देशातील सर्व राज्यातील सर्व अंतोदय व बीपीएल कार्ड धारकांना प्रति लाभार्थी पाच किलो तांदूळ देण्यात येत आहे. पुरवठा विभागाकडून जलद कसे लवकर धान्य रेशन दुकानापर्यंत पोहचवता येईल तसे जलद पोहचवत आहेत. यामुळे अनेक रेशन दुकानात तांदूळ प्राप्त झाला असून वाटपास सुरवात झाली आहे.
सुरगाणा तालुक्यातही 90% रेशन दुकानास PMGKY योजनेचे तांदूळ प्राप्त झाले असून वाटपास सुरवात झाली आहे. याचंच वास्तव हेमाडपाडा येथे दिसून आले असून येथील दुकानदार हौसाबाई गावित, धनराज गावित यांनी धान्य घेण्यास येणाऱ्या प्रत्येकासाठी धान्य घेण्यापूर्वी डेटॉल साबणाने हात धुवण्याची सोय केली असून प्रत्येकाचे सॅनिटायझरने हात स्वच्छ केले जात आहेत. तसेच गावपातळीवर दक्षता कमिटी नेमली असून या दक्षता कमिटीच्या सहकार्याने धान्य घेण्यास येणाऱ्या प्रत्येकाला सोशल डिस्टन्स ठेवत रांगेत एकमेकांजवळ संपर्क येणार नाही अशी रांग लावली आहे. रेशन दुकानदार व दक्षता कमिटी ने गर्दी होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली आहे.
PMGKY तांदूळ योजनेचे प्रारंभ मनखेड सजाचे तलाठी स्वप्निल पालवी यांच्या हस्ते झाले. यावेळी नवसंकल्प एकता परिषद महाराष्ट्र अध्यक्ष दीपक भोये, पोलीस पाटील सुरेश कामडी, पो.पा. रघुनाथ महाले, सुरेश गावित, सरपंच पुष्पा महाले, मा. सरपंच भगवान वड, विविध कार्यकारी मनखेड सोसायटी चेअरमन धनराज गावित, ग्रा.पं. सदस्य गुलाब पाटील, गाव दक्षता कमिटी भावडू महाले, विष्णू गावित, युवराज पाडवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

*स्वप्निल पालवी, तलाठी सजा मनखेड:*
माझ्या सजातील सर्व दुकानदार यांनी PMGKY योजनेचे तांदूळ वाटपास सुरवात केली आहे. लाभार्थ्यांनी रेशन दुकानांमध्ये जाताना जास्त गर्दी करू नये. लाभार्थी आल्यास लाभार्त्याना एक मीटरचे सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत दक्षता घेण्याची सक्त सूचना देण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button