Pandharpur

पंढरपूर यात्रा कार्तिक एकादशी. तब्बल 20 महिन्यानंतर पंढरपूर पून्हा एकदा वारक-यांनी गजबजणार! जिल्हा प्रशासनाकडून कार्तिकी यात्रेस परवानगी.

पंढरपूर यात्रा कार्तिक एकादशी. तब्बल 20 महिन्यानंतर पंढरपूर पून्हा एकदा वारक-यांनी गजबजणार! जिल्हा प्रशासनाकडून कार्तिकी यात्रेस परवानगी.

कोरोना महामारीमुळे गेल्या 20 महिन्यांपासून बंद असलेल्या यात्रांना आता परवानगी देण्यास सुरुवात झाली आहे. यंदा कार्तिकी यात्रा भरविण्यास जिल्हाधिका-यांनी परवानगी दिली आहे. आषाढी आणी कार्तिकी या दोन मोठ्या यात्रा असतात आषाढी यात्रेला परवानगी देण्यात आली नव्हती. मुख्यमंत्री यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कार्तिकी यात्रेला परवानगी दिली आहे. त्यामुळे जवळपास 20 महिन्यानंतर पंढरपूर पुन्हा एकदा वारक-यांन मुळे गजबजणार आहे. प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सादर केलेला प्रस्ताव आणी मंदिर समितीने यात्रा भरविण्यासाठी दाखविलेली तयारी लक्षात घेऊन ही परवानगी देण्यात आली आहे. परंपरेनुसार ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकिय महापुजा, भाविकांचे दर्शन, नैवेद्य, रथोत्सव, महाव्दारका आदी कार्यक्रम यावेळी होणार आहे. कार्तिक यात्रेला साधारण अडिच ते तीन लाख वारकरी पंढरपूरला येत असतात. त्यांच्या नियोजनाच्या दृष्टीने जिल्हाधिका-यानी सूचना दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button