Pune

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने आदर्श निर्माण केला -दत्तात्रय भरणे

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने आदर्श निर्माण केला -दत्तात्रय भरणे

दत्ता पारेकर

पुणे: झोपडीत राहणाऱ्या व उपेक्षित कुटुंबातील सामान्य नागरिकांना,संकटाच्या काळात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका धान्य व जीवनोपयोगी वस्तू मोफत वाटप करून गोरगरिबांच्या सुख-दुःखात समरस झाला आहे.त्यामुळे संकटाच्या काळात गोरगरिबांना मदत करणारा व समाजोपयोगी आदर्श काम करणारा पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आहे.असे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वडापुरी(तालुका इंदापूर) येथील गरीब २०० कुटुंबांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप मोफत सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या करण्यात आले.यावेळी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी,इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट,सहाय्यक पोलीस निरीक्षक बीराप्पा लातुरे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते,उद्योजक संजय दोशी,शिवाजीराव तरंगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,दुष्काळी भागातील १७ गावामध्ये पत्रकार संघाने धान्य वाटप जीवनोपयोगी वस्तूचे मोफत वाटप करण्यासाठी दत्तक घेतली आहेत,खऱ्या अर्थाने गावाकडच्या नागरिकांना अडचणीच्या काळात जी मदत पत्रकार संघाच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे.त्यामुळे गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळतो आहे,पत्रकार संघाच्या माध्यमातून नागरिकांना,करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती व जीवन उपयोगी वस्तू वाटप यामुळे पत्रकार संघाचा वेगळा आदर्श राज्यातील इतर पत्रकार संघ यांनी घ्यावा असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

सुखदुःखाच्या काळात गोरगरिबांच्या समस्या सोडवण्याची भूमिका पत्रकार संघ इंदापूर तालुक्यातील घेतोय याचा मला सार्थ अभिमान आहे. मात्र समाजोपयोगी सुरू असलेल्या व कोरणा दुर्धर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बहुमोल सूचना पत्रकार संघाच्या माध्यमातून मिळत आहेत याचा नागरिकांनी आदर्श घ्यावा असे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक मधुकर गलांडे,मुख्य सचिव सागर शिंदे,पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले,उपाध्यक्ष संदीप सुतार,भीमराव आरडे,आदम पठाण,शिवाजी पवार, शिवकुमार गुणवरे,निखिल कणसे,रामदास पवार,सचिन खुरंगे,आबासाहेब उगलमुगले,इम्तिहाज मुलानी, उदयसिंह देशमुख,दत्तात्रय गवळी,विजयराव शिंदे,गणेश कांबळे,प्रेस फोटोग्राफर अक्षय आरडे,राजेंद्र भोसले,स्वप्नील चव्हाण यांच्यासह पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button