Amalner

?️अमळनेर कट्टा…पोलखोल…अमळनेरात भ्रष्टाचाराचे कुरण..!अमळनेरात बदली करून येण्यासाठी अधिकारी देतात लाखो रुपये…!गावात चर्चेला उधाण..!

?️अमळनेर कट्टा…अमळनेरात भ्रष्टाचाराचे कुरण..!अमळनेरात बदली करून येण्यासाठी अधिकारी देतात लाखो रुपये…!
अमळनेर तालुका हा सर्वच बाबतीत जळगांव जिल्ह्यात अग्रेसर राहिला आहे. अमळनेर ह्या शब्दाचा अर्थ अमळ म्हणजे पवित्र आणि नेर म्हणजे ठिकाण किंवा जागा..अत्यन्त प्राचीन असा वारसा लाभलेले हे गाव..ह्या भूमीला अध्यात्म,संस्कृती,समाजसेवा,राजकारण ह्या सर्वां बरोबरच ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे. प्रताप शेटजी,पूज्य साने गुरुजी, संत सखाराम महाराज या सारख्या दिग्गजांनी कर्मभूमी मानत उद्योग, सेवा भाव आणि अध्यात्माचा पाया रचला..पण गेल्या काही वर्षात ह्या भूमीच्या पवित्रतेला गाल बोट लागलेले आहे..राजकीय भ्रष्टाचारापासून सुरू ही कीड आता संपूर्ण तालुक्याला लागली आहे. ही भ्रष्ट्राचाराची वाळवी इतकी खोलवर लागली आहे की ह्या तालुक्याचा मान सन्मान,पवित्रता तर धोक्यात आलीच पण माणुसकी,आपलेपणा,प्रामाणिकपणा देखील संपुष्टात येत चालला आहे.राजकीय बाबतीत तर तालुका राज्यात बदनाम झालाच आहे.बिकावू तालुका म्हणूनच राज्यात ओळख निर्माण झाली आहे.ही किड लावणारे मात्र नामे निराळे होऊन आलटून पालटून सत्ता भोगत आहेत.
असो पण आता अजून एका बाबतीत तालुका राज्यात बदनाम होत आहे ते म्हणजे येथील मोठया भ्रष्टाचाराच्या कुरणा मुळे अधिकारी अमळनेर ला येण्यासाठी व्याकुळ असतात अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात, जिल्ह्यात च नव्हे तर राज्यात होत आहे. लाखो रुपये अमळनेर ला बदली करून येण्यासाठी मोजले जातात अशी दबक्या आवाजात चर्चा रंगली आहे.संपूर्ण जळगांव जिल्ह्यात अमळनेर मध्ये येण्या साठी अधिकारी वर्ग उत्सुक असतो.साधारणपणे 25 लाख ते 35 लाखांपर्यंत अमळनेर ला बदली करून घेणे,अमळनेर येथून बदली थांबविणे इ साठी मोजले जातात अशी जोरदार चर्चा सुरू आहे. अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी तर अतिरिक्त आयुक्त ची पदोन्नती नाकारून अमळनेर लाच राहणे पसंत केले. याबाबतीत ठोस प्रहारने विद्येला पडला लक्ष्मीचा मोह या मथळ्याखाली बातमी देखील प्रकाशित केली होती.तर असा मोह पडणारे मुख्याधिकारी एकटेच आहेत असे नाही तर अमळनेर च्या भ्रष्टाचाराच्या कुरणात बिनधास्तपणे चरायला लोक प्रतिनिधींनीच्या आशिर्वादाने मिळते.गेल्या 4/5 वर्षात तर काही अधिकारी अमळनेर सोडून जावे लागू नये म्हणून मॅट मध्ये जाऊन बदली रद्द करून आल्याच्या देखील घटना घडल्या आहेत.
अमळनेर चे आजी माजी लोक प्रतिनिधींनीचा.. दोन,तीन दादा,ताईंचा कोणताही दबाव अधिकाऱ्यांवर नाही.ठेवू च शकत नाही..? दोन नं चे धंदे जोरात आहेत. सट्टा जुगार,ऑनलाइन जुगार,वाळू माफिया,रेशन माफिया,दारू धंदे इ जोरात सुरू आहेत.सर्वांचेच हप्ते खोरी सुरू आहे. त्यामुळे अमळनेर म्हणजे अवैध धंद्या बरोबरच अवैध पैसा कमविण्याचे उत्तम ठिकाण असा मस्त समज झाला आहे.
अमळनेरकर सुजाण आहेत,सुज्ञ आहेत जाणकार आणि अभ्यासू आहेत.आजूबाजूला तापी,बोरी,पांझरा नद्या आहेत त्यामुळे कुठे किती व कसं पाणी मुरतंय याची माहिती अमळनेर करांना आहे.गेल्या काही वर्षांपासून हा बदल्यांचा धंदा सुरू झाला आहे. पण इतक्यात काही महिन्यांपासून ह्या सर्व गोष्टींना जबरदस्त ऊत आला आहे. अत्यावश्यक काम कोणाच्या मुंबईच्या फेऱ्या झाल्या,कोणते अधिकारी कसे आले,आणि कार्यरत असलेले अधिकारी इथेच टिकून राहण्यासाठी कुठे कुठे कसे कसे प्रयत्नशील आहेत याची खोलवर चर्चा गावात सध्या सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button