Mumbai Diary: थकलेली बायको आणि त्याचा संशय..!लावला CCTV समोर आली ही गोष्ट..
कोणतंही नातं विश्वासावर टिकून असतं. नात्यात संशयाची पाल चुकचुकली की नात्यातील गोडवा संपत जातो . नात्यामध्ये एकदा फूट पडली की नातं चुकीच्या वळणावर जायला सुरुवात होते. अशात अनेक नाती संपलेली आपण पहिली आहेत. असंच काहीसं घडलं तिच्यात आणि त्याच्यात. नवरा दिवसा ऑफिसला जायचा, बायको घरीच असायची. संध्याकाळी नवरा घरी आला की बायको थकलेली दिसायची. नवऱ्याला बायकोचा संशय यायला सुरुवात झाली. आपण बाहेर गेल्यावर बायको घरी नेमकी करते काय ज्यामुळे ती एवढी थकते याचा छडा लागलाच पाहिजे म्हणून त्याने एक निर्णय घेतला.
नवऱ्याचा आपल्या बायकोवरील संशय दिवसेंदिवस वाढत चाललेला. घरी आल्यावर आपली बायको आपल्याला वेळ का देत नाही? आपल्या जवळ का येत नाही? याची रुखरुख त्याच्या मनात होती. शेवटी त्याने बायको नेमकं घरी करते काय, कुणासोबत वेळ घालवते, हे तपासण्यासाठी बायकोच्या अपरोक्ष त्याने घरात बसवले CCTV. या सीसीटीव्हीमधील फुटेज तपासल्यानंतर नवऱ्याला मोठा धक्का बसला. कारण बायकोचं ते सत्य आता नवऱ्यासमोर आलं होतं. नवऱ्याला बायकोचं सत्य समजल्यावर त्याने थेट हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
नवऱ्याने बेडरूममध्ये जे CCTV लावला
नवऱ्याने बेडरूममध्ये जे CCTV लावले होते त्यात रात्रभर तिला तिची लहान मुलं झोपू देत नसल्याचं पाहायला मिळालं. रात्रभर झोप व्हायची नाहीच, याशिवाय सकाळी बायकोला लवकर देखील उठावं लागत होतं. सकाळी उठून मुलांच्या आंघोळी, नाश्ता, जेवण या सगळ्या गोष्टी तिलाच कराव्या लागत. यामध्ये ती पूर्णपणे थकून जात असल्याचं नवऱ्याला पाहायला मिळालं. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये तिला स्वतःलाही वेळ देता येत नव्हता.
आपली बायको आपल्या मुलांमध्ये आणि संसारात किती बुडली आहे हे नवऱ्याला समजलं. संसार करताना बायको जरी घरी असली तरी तिला किती कष्ट करावे लागतात हे देखील नवऱ्याला समजलं. अखेर नवऱ्याला त्याची चुक उमगली.






