Parola

विद्यार्थ्यांनो नव्या पिढीचे सुजाण नागरिक व्हा — खासदार उन्मेशदादा पाटील

विद्यार्थ्यांनो नव्या पिढीचे सुजाण नागरिक व्हा —
खासदार उन्मेशदादा पाटील

मनोज भोसले
बालाजी विद्या प्रबोधनी पारोळा संचालित करोडपती प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत “”गुंजन सप्तसुरांचे मनोरंजन””
कार्यक्रमाचा खासदारांच्या हस्ते शुभारंभ

पारोळा — शालेय जीवनात अभ्यासाबरोबर सांस्कृतिक आध्यात्मिक व खेळाकडे ही वेळातवेळ लक्ष दिले पाहिजे यातून सर्वांगीण विकास घडतो. विद्यार्थी मित्रांनो आवडीच्या विषयात लक्ष द्या तुम्ही उद्याचे सुजाण नागरिक आहात. शालेय जीवनात कसून अभ्यास करा या तालुक्यातून या शाळेतून आजवर गुणवान विद्यार्थी घडले आहे या मातीचा गुणधर्मच आहे इथून अनेक अधिकारी घडले आहेत. यापुढेही जबाबदार नागरिक घडावे अशी अपेक्षा केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालय आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाच्या स्टॅण्डिंग
कमेटीचे सदस्य तथा खासदार उन्मेष दादा पाटील यांनी आज पारोळा येथे व्यक्त केले. पारोळा येथे श्री बालाजी विद्या प्रबोधिनी संचलित करोडपती प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली. करोडपती इंग्रजी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात आज पहिली ते बारावी विद्यार्थ्यांचा तीन दिवसीय कला गुण गौरव वार्षिक स्नेहसंमेलन “गुंजन सप्तसुरांचे मनोरंजन” आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा , शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण दादा पवार, संस्थेचे अध्यक्ष यु.एस.करोडपती,सचिव डॉ. सचिनदादा बडगुजर, ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष विलास नेरकर, ग.स.संचालक सुनील पाटील, नगरसेविका जयश्री बडगुजर,संचालिका मंगलाताई करोडपती, नगरसेविका रेखाताई चौधरी ,नगरसेविका अलकाताई महाजन, संस्थेचे संचालक सुनील बडगुजर, आशिष बडगुजर, ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री बाळासाहेब पाटील विश्वासराव चौधरी ,अभय पाटील ,रावसाहेब भोसले ,संजय पाटील, योगेश पाटील,विशाल महाजन तसेच बालाजी विद्या प्रबोधिनी च्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक, कर्मचारी व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी शेवटी आपल्या मनोगतातून संस्थेच्या वाटचालीस तसेच स्नेहसंमेलानात सहभागी विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यानी विविध कला सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button