Ahamdanagar

ना.प्राजक्तदादा तनपुरे यांच्या पाथर्डी जनता दरबारात सरकारी अधिकाऱ्यां विरोधात तक्रारीचा पाउस

ना.प्राजक्तदादा तनपुरे यांच्या पाथर्डी जनता दरबारात सरकारी अधिकाऱ्यां विरोधात तक्रारीचा पाउस

सुनील नजन

महाराष्ट्र राज्याचे उर्जा राज्य मंत्री ना.प्राजक्तदादा तनपुरे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सोशल डिस्टंन्सचे पालन करत जनता दरबार भरवला होता .त्या जनता दरबारात पाथर्डी तालुक्यातील अनेक विभागातील सरकारी अधिकारी वर्गाच्या गैरकारभारविरुद्धात लोकांनी तक्रारीचा अक्षरशः पाउस पाडला ,विषेशतः क्रुषीविभागातील क्रुषीसहाय्यकाने कासारपिंपळगाव मधील शेतकरी मुरलीधर भगत,ज्ञानेश्वर जगताप, भाऊसाहेब शेळके यांना डाळिंबाचे अनुदान मिळवण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार केली. त्या संदर्भात ना. महोदयांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.प्रथम भोसे येथे सिंगलफेज विजकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. देवराई येथे रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.

तिसगाव येथे म्हस्के सराफ,अविकाका नरवडे यांच्या घरी जाऊन भेट दिली तसेच मयत बाबासाहेब भानुदास चितळे यांच्या घरी जाऊन दुखिःतांचे सान्त्वन केले. याप्रसंगी सरपंच काशिनाथ पा. लवांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे,मढीच्या कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे,संजय लवांडे,लक्ष्मण जवने,नितीन लवांडे,संभाजी पालवे,अतुल बनकर, नारायण नजन,सुनिल पुंड,संदिप राजळे,अशोक कदम,यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button