Pandharpur

पंढरपूर तालुक्यातील सोनके येथील श्रीनाथ विद्यालयातील 170 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

पंढरपूर तालुक्यातील सोनके येथील श्रीनाथ विद्यालयातील 170 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर दि 29 जून कोरोनाचा प्रादुर्भाव
रुग्ण संख्या तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती शिक्षण विभाग पंढरपूर यांच्या विद्यमाने सुरू असलेल्या माझी धरती माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत सोनके येथील श्रीनाथ विद्यालय येथील आज गुरुवार दिनांक 29 रोजी 170 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आलीआहे.विद्यालयातील सुमारे 170 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी कोरोना चे सर्व नियम पाळून दोन टप्प्यात करण्यात आली यावेळी डॉक्टर हाके यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. कोरोना पासून वाचवण्यासाठी नेमके काय काळजी घ्यावी कोणते उपाय करावे व वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता कशी राखावी याविषयी विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष आर बी जाधव सर व माजी मुख्याध्यापक श्री मुलांनी बी एम उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक महेश इंगोले सर श्रीमती शिंदे मॅडम श्री रमेश चव्हाण सर श्री बाळासाहेब बाबर सर श्री शिकलगार सर सौ पवार मॅडम व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button