चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
आज प्रत्येक समाजात आरक्षणासाठी चढाओढ़ लागली आहे यात सामाजिक पण रोजगारासाठी झटणारा आजचा तरुण भरडला जात आहे आरक्षणाच्या नावाखाली आदिवासी तरुण ,तरुणी दिशाभूल होऊन शिक्षणाकडे दुर्लक्ष करू लागलेत यात खरा आदिवासी आणि बनावट आदिवासी हा नवा वाद असल्याने विषय गंभीर होतो आहे आरक्षणासाठी मोर्चे निघतात पण शिक्षणासाठी मोर्चे निघत नसल्याची खंत व्यक्त करीत आरक्षणापेक्षा शिक्षणाची कास धरा असे आवाहन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी आदिवासी तरुण ,तरुणीना केले .ते दिनांक 9 ऑगष्ट रोजी आयोजित आदिवासी गौरव दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रम समारोपाच्या अध्यक्षस्थानी चोपडा तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार जगदीशभाऊ वळवी हे होते .आपल्या अध्यक्षीय आणि अभ्यासनीय मनोगतात बोलतांना जगदीशभाऊ म्हणाले की आजच्या आदिवासी गौरव दिनानिमित्त किमान दहा हजार आदिवासी बांधव या कार्यक्रमात सहभागी होतील असे आमचे नियोजन होते पण हवामान खात्याने अतिवृष्टिचा इशारा दिला आणि तो सुदैवाने खरा ठरला म्हणून आदिवासी बंधु,भगिनी यांची ग़ैरसोय होउ नये म्हणून आम्ही 8 ऑगष्ट रोजीच सायंकाळी सर्वांना संपर्क करुन आपण येवू नये म्हणून विनंती केली .आदिवासी दिवस हा दरवर्षी येतो तो आता नाहीतर पुढल्या वर्षी साजरा करता येईल पण आज महाराष्ट्रभर पावसाची ,पाण्याची आवश्यकता आहे आज वरूण राजाने कृपा केली हाच आमचा आदिवासी दिवस साजरा झाला असे मी समजतो .पुढे बोलतांना भाऊ म्हणाले की चोपडा तालुक्यातील आमचेच काही आदिवासी तरुण चुकीचे काम करुन आम्हा आदिवासी बंधु भागिनिना एकत्र येवू देत नाही कारण त्यांना भीती असते की समाज एक झाला की आपल्याला सामाजिक प्रश्न विचारला जाईल. अश्या इतरांच्या तव्यावर आपली पोळी शेकणाऱ्या तथाकथित राजकीय मंशा असणाऱ्या व्यक्ति पासून समाजाने सावध राहिले पाहिजे .मी आमदार असतांना कोणीही आदिवासी विद्यार्थी आला की त्याला आधी शिक्षण पूर्ण कर मग राजकारणात ये असा सल्ला दिला जातो .पण काही आमचीच माणसे तरुण वर्गाला भटकवतात,आपलेच आपल्याला संपवण्याच्या मार्गावर आहेत अश्या अति उत्साही पण समाजात दुफळी निर्माण करणाऱ्यांपासुन आदिवासी तरुणांनी सावध राहिले पाहिजे माझे आदिवासी बंधु भगिनी शिकले पाहिजे ते आय एस,आईपी एस झाले पाहिजेत म्हणून मी भविष्यात लवकरच चोपडा शहरात स्पर्धा परीक्षा केंद्र आणून साऱ्यांची सोय करील यासाठी मी माझी सर्व शक्ती पणाला लाविन आदिवासी मूलं, मूली यांच्यासाठी वस्तीगृहाची गरज आहे ते आणण्यासाठी सरकारला भाग पाडेन,तालूका पातळीवर सुंदर असे शैक्षणिक संकुल व्हावे सुसज्ज असे वाचनालय व्हावे अशी माझी अंतर्गत ईच्छा असून त्याचा मार्ग मी स्वतः लक्ष देवून मोकळा करेन कितीही प्रतिकूल परिस्थिति असली तरी आधी शिक्षण घ्या शिक्षणा शिवाय पर्याय नाही .राजकारण कधीही म्हातारे होत नसते राजकारणात तरुणांनी आले पाहिजे यात शंका नाही पण आधी आपला काहीतरी व्यवसाय,आपला परिवार सूस्थितीत आणा काहीतरी उद्योगाची कास धरा स्वतः स्वयम्भू ,सक्षम व्हा असे आवाहन चोपडा तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार जगदीशभाऊ वळवी यांनी आदिवासी पालक,तरुण,तरुणी, उपस्थितांना केले .शहरातील जूना यावल रोड येथील अग्रसेनभवन येथे सकाळी 11 वाजता आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला .सुरुवातीस आदिवासी समाजाचे आराध्य दैवत देवमोगरामाता
विरसामुंडा यांच्या प्रतिमेस अरुणभाई गुजराथी,जगदीशभाऊ वळवी,सौ रचनाताई वळवी,रमेशबापू ठाकुर,रज्जाक तडवी राजुदादा तडवी,कु राजश्री वळवी,सीताराम पारधी,आदिवासी पारधी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब सालुंखे,महासचिव राणा सोनवणे, हैदराबाद येथील के गोपी पारधी,प्रदेश अध्यक्षा सौ इंदुमती सालुंखे (गुजरात),मुकेश सालुंखे(मुंबई),उमाकांत चव्हाण (मुंबई),सुरेश सोनवणे (नाशिक),दीपक खांदे ( नांदगांव) सौ कांचन राणे आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करण्यात आले.कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपस्थित सर्वच आदिवासी बांधवांनी पारम्पारिक पद्धतीने आदिवासी नृत्य करुनआमू आखा एक छे म्हणत आनंद व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक शामसिंग वळवी यांनी केले.







