चिमूर प्रतिनिधी – ज्ञानेश्वर जुमनाके
सध्याच्या स्थितीत कोरोना विषाणू संकट फोफावत असल्याने शासनाने संचारबंदी करीत वाहतूक सेवा बंद केली असल्याने मजुरांना आपल्या स्वगावी जाणे कठीण झाले तेव्हा घटनेची माहिती मिळताच आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी माजी सभापती राजूभाऊ पाटील झाडे यांच्या माध्यमातून त्यांना वाहतूक व्यवस्था करून देण्यात आली .
सिंदेवाही, नवरगाव, सावली व गडचिरोली जिल्ह्यातील मजूर वर्धा जिल्ह्यातील पारडा व परिसरात जवळपास 50 मजूर चना कटाई करण्यासाठी गेलेले होते परंतु दरम्यान कोरोना विषाणू संकट राज्यात फोफावल्याने शासनाने संचारबंदी केल्याने वाहतूक व्यवस्था बंद झाली मजुरांना आपल्या स्वगावी जाण्यास साधन नव्हते तेव्हा ते मजूर पायदळ येत होते आमडी जवळपास येत असताना एका मजुराने आमदार बंटीभाऊ भांगडीया यांना मोबाईल वरून फोन करून आपबीती सांगितल्यावर आमदार बंटीभाऊ यांनी धीर दिला आणि आमडी येथे थांबन्याचे सांगून त्यांनी माजी सभापती राजूभाऊ झाडे पाटील यांना फोनवरून मजुरासंदर्भात सहकार्य करण्याची माहिती दिली
50 मजूर आमडी येथे आल्यावर राजूभाऊ झाडे यांची भेट घेतली त्या मजुरांकडून माहिती घेत व्यथा ऐकून घेतली आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्था केली त्यात एक पिकप व सुमो वाहन करून त्यांना त्यांच्या स्वगावा कडे रवाना करण्यात आले पूर्वी त्या मजुरांना चहा पाणी व्यवस्था करण्यात आली
राजूभाऊ यांनी मजुरांना जेवणाची व्यवस्था करतो म्हणाले परंतू मजुरांनी वेळ होईल या कारणाने चहा वर समाधान व्यक्त केले .
आम्ही मजूर आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या मतदार क्षेत्रातील नसताना देखील आमदार बंटीभाऊ यांनी दया माणुसकी मानवता दाखविली त्याबद्दल आभार व्यक्त केले
यावेळी माजी सभापती राजू भाऊ झाडे, ठाणेदार स्वप्नील धुळे ,सरपंच वामन गुळधे, संगणक परिचालक सुनील गुळधे आदी उपस्थित होते.
दरम्यान चिमूर येथील श्री दंदे यांची मुलगी नागपूर वरून चिमूर साठी येण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली.
कोरोना विषाणू संकट असताना काही विरोधक सोशल मीडियावरून स्थानिक आमदार यांचे दुर्लक्ष असल्याच्या व भडकावू पोस्ट सेंड करीत आहे
परंतु त्या पोस्ट करणाऱ्यांना माहीत नाही काय?
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची अविरहीत सेवा सुरू आहे कोरोना विषाणू संकट असताना सुद्धा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची चौफेर नजर राहते …………






