अमळनेर शहरातील श्रीकृष्णपुरा, मोहाडीकर प्लॉट, सप्तशुंगि नगर, सावतावाडी, शारदा कॉलनी, हनुमान नगर, शिरूर नाका भागात
प्रतिनिधी नूरखान
अमळनेर शहरातील श्रीकृष्णपुरा, मोहाडीकर प्लॉट, सप्तशुंगि नगर, सावतावाडी, शारदा कॉलनी, हनुमान नगर, शिरूर नाका भागात अमळनेर नगरपरिषद, विप्रो कंपनी अन् आधार सामाजिक संस्था यांच्या संयुक्त या भागातील विद्यमाने माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी कोरोना या आजारावर मात करण्यासाठी परिसर स्वच्छता अन् शाररिक स्वंस्फूर्तीने स्वच्छता राखून नियमित हात धुणे साठी प्रत्येक कुटूंबाची काळजी म्हणून मोफत प्रति कुटूंब ४ नग संतूर साबण आज श्रीकृष्ण मंदिर भागातून सुरक्षित अंतर ठेवून माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड , श्रीमती भारती पाटील व विक्रांत भास्करराव पाटील यांचे हस्ते देवून सुरवात करून उर्वरित संपूर्ण भागातील कुटूंबाना घरपोच संतूर साबण वाटप याभागातील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत पाटील सोबत योगीराज चव्हाण, पप्पू भावसार, प्रवीण ठाकूर, दीपक पावले, कैलास सोनार, शिवम पवार, कैलास पाटील, गणेश बारी, समाधान पाटील , भूषण ठाकूर, सागर शेटे, विनायक बडगुजर, सोनुभाऊ पावले, भैया सोनार, जगदीश सोनार, किशोर बारी, नंदू वसाने, महेंद्र कोळी, दिनेश पाटील, गणेश बिऱ्हाडे, मोटू बारी, प्रमोद , बाळासाहेब ठाकुर आदींनी केल्याने नागरिक समाधानी झालेत.






