“येवल्यातील २५ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक””
नाशिक प्रतिनिधी शांताराम दुनबळे
येवला तालुक्यातील ज्या २५ विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांची मुदत संपली आहे त्या ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली असून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा कारभार चालवण्यासाठी आता विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . उन्मेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश काढले आहे.यामुळे ग्रामपंचायतीचा गाडा हाकणाऱ्या पुढाऱ्यांना धक्का मानला जात आहे .
तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींची मुदत जुलैपर्यंत अखेपर्यंत संपत आहे.तर २५ ग्रामपंचायतीची मुदत एप्रिलमध्येच संपली आहे या २५ ग्रामपंचायतिचा निवडणूक कार्यक्रमही जाहीर झाला होता . निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्जही दाखल झाले होते त्या दरम्यानच करोनाचा कहर सुरू झाल्याने निवडणूक आयोगाने आहे त्या स्थितीत निवडणूक रद्द केली आहे . त्यानंतर अद्यापही करोना ठाण मांडून असल्याच्या धर्तीवर लॉकडाऊन सुरू असून निवडणूक घेणे शक्य नाही.लॉकडाऊन काळातच विद्यमान सदस्यांची मुदत देखील संपली आहे . त्यामुळे प्रशासक नेमण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे .
ग्रामपंचायत अधिनियमानुसार एकाच वेळी सरपंच व उपसरपंच पद रिक्त असल्यास गटविकास अधिकारी हे विस्ताराधिकारी संवर्गातील अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करतील आणि प्रशासकीय कारभार नव्याने सरपंच पदाची निवडणूक होईपर्यंत राहिल . सरपंचाची सर्व जबाबदारी प्रशासकीय अधिकारी पार पडतील त्यानुसार तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीवर गटविकास अधिकारी उन्मेष देशमुख यांनी आदेश काढून प्रशासक नेमले आहे . खामगाव व रेंडाळे येथे ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी भाऊसाहेब आहीरे , भारम येथे सहाय्यक गटविकास अधिकारी अन्सार शेख , आहेरवाडी व खिर्डीसाठे येथे आनंद यादव , नागडे व मातुलठाण येथे जे . एम . पाटील कुसमाडी व अनकुटे येथे पी.एल. वास्ते , धामोडे व ममदापूर येथे किरण मोरे , पिंपळखुटे व तळवाडे येथे यु . बी . सूर्यवंशी , देवळाने व बोकटे येथे पी . सी . त्रिभुवन , पारेगाव व बल्हेगाव येथे भडकवाडे , कोळगाव व अंगुलगाव येथे ए.आर. फारूकी , भुलेगाव व आडसुरेगाव येथे ए . बी . जव्हाड , रहाडी व खरवंडी येथे पी.आर.आहेर तर पन्हाळसाठे व डोंगरगाव येथे मारवाडी या अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे .






