World

Big Breaking..अशावेळी भारत-चीनमध्ये पडू शकते युद्धाची ठिणगी; शी जिनपिंग यांनी दिला तो आदेश..!

? Big Breaking..अशावेळी भारत-चीनमध्ये पडू शकते युद्धाची ठिणगी; शी जिनपिंग यांनी दिला तो आदेश..!

चीनचे हुकुमशहा व अध्यक्ष आणि तिन्ही सेवांचे सर्वोच्च कमांडर शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीला आदेश दिला आहे. ज्यात युद्धासाठी तयार राहण्याचा स्पष्ट संदेश आहे. त्यामुळे अशावेळी भारत-चीन यांच्यात लडाखमधील भागात कधीही युद्धाची ठिणगी पडू शकते.

नवभारत टाईम्स यांनी बातमीत म्हटले आहे की, शी जिनपिंग यांनी सांगितले आहे की, लष्कराने आपल्या युद्धाची तयारी अधिक तीव्र केली पाहिजे. जिनपिंग यांनी हा आदेश अशा परिस्थितीत दिला आहे जेव्हा चीनचा अमेरिका आणि भारताबरोबरचा तणाव सर्वोच्च पातळीवर आहे. त्यामुळे याला वेगळे संदर्भ जोडले जात आहेत.
मुजोर आणि बे भारवशी अशीच चीनची प्रतिमा जगभरात आहे. चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या आदेशादरम्यान चिनी सैन्याने तिबेटमधील भारतीय सीमेजवळ जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

शिगेट मिलिटरी सबकमांडच्या चिनी सैनिकांनी तिबेटमध्ये युद्धाचे प्रशिक्षण सुरू केले आहे. सुमारे पाच हजार मीटर उंचीवर हा सराव केला जात आहे.
चीनचे अधिकृत मुखपत्र ग्लोबल टाइम्सने या तयारीचा व्हिडिओ तयार केला आहे. यात चिनी सैन्य युद्ध लढण्याचा सराव करत असल्याचे दिसून येते. दरम्यान, चिनी सैनिक गोळीबार करत आहेत आणि शत्रूच्या भागाचा ताबा घेत आहेत, असेही यात दाखवलेले आहे.

या वर्षी आपल्या आदेशात जीनिपिंग यांनी म्हटले आहे की, लष्कराने आपल्या अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना प्रत्यक्ष युद्धपरिस्थितीत प्रशिक्षण दिले पाहिजे, युद्ध आणि लष्करी कारवायांवरील संशोधनाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, अधिक आपत्कालीन कवायती केल्या पाहिजेत, सतर्क राहिले पाहिजेत जेणेकरून सैनिक कोणत्याही लष्करी कारवाईसाठी नेहमीच तयार असतील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button