Kolhapur

गारगोटी येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

गारगोटी येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

कोल्हापूर प्रतिनिधी-सुभाष भोसले

भुदरगड तहसिल कार्यालय व आखिल भारतीय ग्राहक पंचायत भुदरगड यांच्या संयुक्त विद्यमाने 2४ डिसेंबर हा दिन राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला . या दिनाचे महत्व सामान्य लोकांना समजणेसाठी मुख्याध्यापक मिलिंद पांगीरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गारगोटी हायस्कूल गारगोटीच्या विद्याथीनीनी ग्राहक सप्ताह जनजागरण फेरी शहरातून काढली. यानंतर भुदरगड तहसिलमध्ये तहसिलदार अमोल कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमेचे पुजन केले .
यावेळी आखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे शहर संघटक प्रा . सागर पोवार यांनी प्रास्तावीक केले . या कार्यकमाला पत्रकार रविराज पाटील . अनुबोध मासिकाचे संपादक मिलिंद प्रधान पुरवठा अधिकारी . संदीप भुतल लिपिक उत्तम खापरे अखिल भारतीय ग्राहक पंचायताचे विभागप्रमुख रमेश पाटील तालुका अध्यक्ष कुंडलीक शिर्सेकर तालुका महिला अध्यक्षा ऐश्वर्या पुजारी,जिल्हा महिला सदस्या मनाली , संघटक सागर पोवार उपाध्यक्ष सागर . गुरव . सचिव आर पी पाटील . युवराज पाटील बाळासाहेब पाटील सुरेश सुर्यवंशी सहसचिव हेमंत थडके शहर अध्यक्ष सुधीर कुरळे प्रा . शेखर पाटील. प्रमोद मस्कर . महिला सचिव सुप्रिया सुर्यवंशी संघटक वनिता सुतार . संजीवनी सुतार ,दयानंद सुतार,पत्रकार नारायण सुतार,डी.वाय.देसाई ,संदिप दळवी हजर होते.दुपारी तीन वाजता ज्येष्ठ नागरीक सेवाभावी संस्था गारगोटी येथे ज्येष्ठ नागरीक लोकांना ग्राहक संरक्षण कायदा या विषयी प्रांत कार्यकारिणी सदस्य प्रसाद यांनी मार्गदर्शन केले यावेळी तह सिलदार अमोल कदम, ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संघाचे अध्यक्ष आर.एन. कारखानीस . बी.एस. माने ,टी .बी पाटील . श्री सोळसे श्रीकांत शहा इत्यादी हजर होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button