Dhule

खाजगीकरणाच्या विरोधात भीम आर्मीचे “कपडे फाडो” आंदोलन

खाजगीकरणाच्या विरोधात भीम आर्मीचे “कपडे फाडो” आंदोलन

धुळे अजहर पठाण

कोरोना व लॉकडाऊनचा फायदा घेऊन केंद्रातील मोदी सरकारने कामगार, शेतकरी, कष्टकरी, मजूर व सर्वसामान्य जनतेच्या विरोधात अनेक अध्यादेश व कायदे आणले व कामगार व जनतेनी गेल्या 100 वर्षांत लढून मिळवलेले अधिकार नष्ट केले. केंद्रसरकरच्या या जनविरोधी तसेच खाजगीकरण धोरणांच्या विरोधात भीम आर्मी धुळे जिल्हाच्या वतीने कपडे फादो आंदोलन छेडण्यात आले व कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

त्याच पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात भीम आर्मी च्या वतीने मोठ्या संख्येने मोर्चा काढून “कपडे फाडो” आंदोलन करीत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, धुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठवत अहो, मोदी सरकारने जो खाजगीकरणाचा घाट घातला आहे, यामुळे येणाऱ्या काळात पुढच्या पिढीला खूप अतोनात हाल होणार आहे. हे भीम आर्मी खपऊन घेणार नाही. अशी प्रतिक्रिया धुळे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button