Nashik

स्वातंत्रवीर वी.दा.सावरकर एक महान क्रांतिकारी बहुआयामी व्यक्तिमत्त्व: खा.डॉ.भारती पवार

स्वातंत्रवीर वी.दा.सावरकर एक महान क्रांतिकारी बहुआयामी व्यक्तिमत्त्व: खा.डॉ.भारती पवार
सुनिल घुमरे नाशिक
नाशिक : महान देशभक्त, लेखक, समाजसुधारक आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले थोर स्वातंत्रसेनानी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जयंतीनिमित्त दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा. डॉ.भारती पवार यांनी भागुर येथील त्यांचे जन्मस्थळी तसेच भारतीय जनता पार्टी कार्यालय वसंतस्मृती येथे वी.दा.सावरकर यांना अभिवादन केले. वीर सावरकरांनी भारत मातेसाठी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात वीर सावरकर लाखो करोडो लोकांचे प्रेरणाश्रोत होते. आपल्या अमोघ वक्तृत्वाने आपल्या धारदार लेखणीने त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी शेकडो तरुणांना प्रेरित केले होते. अभिवादन प्रसंगी खा.डॉ.भारती पवार यांचे समवेत महापौर सतीश कुलकर्णी, आ.सौ.सीमा हिरे, महाराष्ट्र प्रदेश नेते तथा प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजपा शहर अध्यक्ष गिरीश पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, जिल्हा सचिव शरद कासार, मंडल अध्यक्ष कैलास गायकवाड, तालुका सरचिटणीस सुनील जाधव, भाऊसाहेब आहेर, प्रसाद आडके, शेखर कस्तुरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button