Chandrapur

क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविल्यामुळे आदिवासी समाज आक्रमक पुतळा पुन्हा आदरपूर्वक बसविण्याची बिरसा क्रांती दलाची मागणी

क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविल्यामुळे आदिवासी समाज आक्रमक पुतळा पुन्हा आदरपूर्वक बसविण्याची बिरसा क्रांती दलाची मागणी

रत्नागिरी : चंद्रपूर महानगर पालिका हद्दीतील रेल्वे स्थानका नजीक महामानव क्रांतीसूर्य जननायक बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविल्यामुळे आदिवासी समाजामध्ये संताप निर्माण झाला आहे. हटविलेला पुतळा पुन्हा त्याच जागी आदरपूर्वक बसविण्यात यावा,अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली होती.मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत जिल्हाधिकारी चंद्रपुर व नगरविकास विभाग 2 यांस कार्यवाहीसाठी निर्देश देण्यात आले आहेत. सदर निवेदन सुशीलकुमार पावरा यांनी चंद्रपुर चे पालकमंञी विजय वडेट्टीवार ,चंद्रपुर चे आमदार किशोर जोरगेवार,खासदार बाळूभाऊ धानोरकर,जिल्हाधिकारी चंद्रपुर व आयुक्त महानगरपालिका चंद्रपुर यांनाही पाठवले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,दैनिक वृत्तपत्र ‘सकाळ वृत्तसेवा’ दिनांक-27 फ़रवरी 2021 मधील बातमी नूसार आपले लक्ष एका गांभीर्यपूर्व विषयाकड़े वळविण्यात येते की,आदिवासी समाजाचं मान-सन्मान, आधारस्तंभ,ऋध्दास्थान महामानव क्रांतीसूर्य जननायक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे चंद्रपूर महानगर पालिकेने स्थापित पुतळ्याला हलविण्याचे कारस्थाने केल्याचे दैनिक वृत्तपत्राच्या माध्यमातून समजले.
मा.महोदय पुतळ्याची होणारी विटंबना तात्काळ थांबवावे व पुन्हा आदरपूर्वक जननायक बिरसा मुंडा यांना विराजमान करावे अन्यथा शांत संयमी आदिवासी समाज रस्त्यावर येऊन आंदोलन करेल यांची नोंद घ्यावी. अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे व संबंधित विभागाकडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button