चाळीसगाव नगरपरिषदेच्या शाळा पुन्हा सुरु करा.पीपल्स फाउंडेशनची मागणी
चाळीसगाव प्रतिनिधी- मनोज भोसले
चाळीसगाव जि. जळगाव येथील नगरपरिषदेच्या शिक्षण विभागा अंतर्गत येणाऱ्या न. पा. शाळा या प्रचंड दुरावस्थेत असल्यामुळे बंद पडलेल्या आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे निम्न मध्यमवर्गीय व अल्प उत्पन्न गटातील जनतेचे प्रचंड हाल होत आहेत.
त्यातूनच खासगी शाळांकडून ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली भरमसाठ पैसे उकळले जात आहे व हा सर्व खर्च या अल्प उत्पन्न गटातील श्रमिक मजूर, कामगार यांच्या आर्थिक परिस्थितीला परवडणारा नाही.
अशा या बिकट काळात महामहिम शासनाने नगरपरिषदेच्या या शाळांचे पुनरुज्जीवन करून सर्वसामान्य जनतेच्या पाल्यांची शिक्षणाची दारे उघडी करावी. असे निवेदन स्नेहा फरतडे उपमुख्याधिकारी यांना फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले यावेळी आकाश पोळ अध्यक्ष पीपल्स सोशल फाउंडेशन प्रकाश पाटील ता उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, करण सुर्यवंशी, अतुल चौधरी, चंद्रकांत महाजन,अनिकेत पोळ,गौरव पाटील ,रमाकांत शिरसाठ, सागर अहिरे,पारस सांगिले, अरविद खेडकर, मुकेश कुमावत,आदी उपस्थित होते.






