Paranda

श्रीगुरु वै. हरिभाऊ महाराज पाटील यांच्या नावाने दिला जाणारा ज्ञानभक्ती सेवा पुरस्कार सोहळा आज परंडा येथे संपन्न

श्रीगुरु वै. हरिभाऊ महाराज पाटील यांच्या नावाने दिला जाणारा ज्ञानभक्ती सेवा पुरस्कार सोहळा आज परंडा येथे संपन्न

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

परंडा ( सा.वा ) दि. १७

परंडा तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज श्रीगुरु वै. हरिभाऊ महाराज पाटील यांच्या नावाने दिला जाणारा ज्ञान भक्ती सेवा पुरस्कार ह भ प गुरुवर्य प्रभाकर दादा बोधले श्री क्षेत्र पंढरपूर यांना देण्यात आला. वारकरी संप्रदायामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कीर्तनकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. वारकरी संप्रदाय तमिळनाडू, कर्नाटक ,आंध्र प्रदेश ,या तीन राज्यांमध्ये पोचवल्याबद्दल श्री गुरु ह भ प प्रभाकर दादा महाराज बोधले यांना देण्यात आला. तसेच वारकरी संप्रदायाची सेवा निष्ठेने केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. ते संत माणकोजी महाराज यांचे विद्यमान वंशज आहेत. त्यांनी कीर्तनातून समाज प्रबोधनाचे फार मोठे कार्य केलेले आहे.

त्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील, नवनाथ आप्पा जगताप ,संदीप खोसे पाटील , मेघराज दादा पाटील , ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर ह भ प माधव महाराज नामदास, ह भ प माधव महाराज शिवणीकर, ह भ प भागवत महाराज कबीर, ह भ प जयवंत महाराज बोधले, ह-भ-प मारुती महाराज तुनतुने शास्त्री, ह भ प गणेश महाराज पाटील भ प बिबीशन महाराज गिलबिले, ह-भ-प कुमार महाराज केमदारणे, ह-भ-प गोपीनाथ महाराज बानगुडे ह-भ-प सतीश महाराज सूर्यवंशी, हभप नागेश महाराज मांजरे , ह भ प दत्ता महाराज हुके भ प सतीश महाराज कदम ह-भ-प ज्ञानेश्वर माऊली नंधनकर , ह-भ-प शिवाजी चव्हाण, ह भ प जगन्नाथ महाराज देशमुख, ह भ प गणेश महाराज कोल्हे, ह भ प दत्ता महाराज वाघ ह भ प विठ्ठल महाराज घुले, ह भ प बालाजी महाराज बोराडे सुहास पाटील, हे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button