मोठा वाघोदा ग्रामपंचायती त ग्रामसेवकांची, हजेरी नियुक्ती होऊनही पदभार देण्यास टाळाटाळ ३ वर्ष उलटून ही जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याची ग्रामपंचायत सदस्य यांची जिल्हाधिकारी यांना केली लेखी तक्रार जिल्हाधिकारी जळगांव दखल घेतील कालोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडणूकीत दारोदार फिरून मते मागणारे सरपंच कोरोना संकटकाळी घरात बसून*
प्रतिनिधी मुबारक तडवी
*मोठा वाघोदा तालुका रावेर या शेजारच्या सावदा,लहान वाघोदा ,चिनावल ,मस्कावद सह सर्व गावांत कोरोना संक्रमित रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने मोठा वाघोदा वासिय गावकर्यांत भितीचे वातावरण पसरले आहे मात्र येथील लोकनियुक्त सरपंच मुकेश रामदास तावडे सह ग्रामसेवक मात्र निर्धास्त असल्याचे स्पष्ट निदर्शनास येत आहे नागरिकांच्या जिवाची काही एक पर्वा नसलेल्या निष्काम सरपंच यांचे ढिसाळ कारभार व निष्क्रियतेवर जिल्हाधिकारी सो , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सह जळगांव
प्रशासन लक्ष देणार काय? परमेश्वर कृपेने मोठा वाघोदा गावात कोरोना संक्रमित एकही रुग्ण आढळलेला नाही मात्र दुर्दैवाने झालेच तर उपाय योजना सोई सुविधा उपलब्ध होण्यासाठी नागरिकांनी जायचे तरी कुणाकडे ? सह्याजीराव सर्वोच्च पदस्थ सरपंचांनी ग्रामस्थांना वार्यावर सोडत बाहेर गावी आपला सुखी संसारात मग्न आहेत.तसेच निवडणूक लढविणार विजयी उमेदवार यांनी राखीव जागेवर निवडणूक लढवित निवडून आलेल्या मध्यवर्ती कालावधीत ६ महिन्याचे आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे मात्र मोठा वाघोदा येथील लोक नियुक्त सरपंच मुकेश रामदास तावडे यांनी २८ महिने संपूनही अद्ययावत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नसून महाशय जिल्हाधिकारी सो.. जळगांव हे या बेजबाबदार , निष्क्रिय ,कर्महीन जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न करणार्या सरपंच यांचेवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य यांनी जिल्हाधिकारी जळगांव यांना लेखी तक्रार केली आहे






