Faijpur

म्युनिसिपल हायस्कुल माजी विद्यार्थ्यांची तब्बल ३८ वर्षानंतर सुदामा भेट

म्युनिसिपल हायस्कुल माजी विद्यार्थ्यांची तब्बल ३८ वर्षानंतर सुदामा भेट

सलीम पिंजारी

फैजपूर ता यावल 11मार्च
मित्रांची ओढ ही जगातील सर्व नात्यातील सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे मैत्री या शब्दाला कोणतीही इयत्ता, वय ,जात ,धर्म, पंथ ,व्यवहाराची घेणेदेणे आदी काही नसते तिच्यातील भेटीची आतुरता ,आठवणींचा सुगंध, व अनमोल स्नेहा ची ओढ म्हणजेच मित्रता त्यातही विशेष म्हणजे बालमित्र किंवा लंगोटी मित्र होय याचाच प्रत्यय येथील नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल फैजपूर मधील सन 1982 च्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांची हायस्कूलमध्ये तब्बल 38 वर्षानंतर व्हाट्सअप च्या माध्यमातून घडून आली सुदामा भेट.

याप्रसंगी मुंबई ,पुणे, नाशिक ,जळगाव अन्य भागात नोकरी, व्यवसाय निमित्त गेलेली मित्र फैजपुर खंडोबा यात्रा महोत्सव निमित्त दिनांक १० मार्च रोजी म्युन्सिपल हायस्कूलमध्ये २० माजी विद्यार्थी एकत्रित आले होते याप्रसंगी एकमेकांना आरे कारे करत अरे तू कसा दिसतोस ,काय करतोस, कुठे आहे ,संसाराचा प्रपंच काय म्हणतो अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती करत त्यांचे डोळे पाणावले होते या मित्र भेटीत डॉक्टर, प्राचार्य, प्राध्यापक, इंजिनिअर ,शिक्षक, व्यवसायिक, पत्रकार व मोलमजुरी करणारे सारे वर्गमित्र सर्वकाही विसरून शाळेतील बाल प्रसंगांना आठवत आनंद लुटत होते ही माजी विद्यार्थ्यांची ही सुदामा स्नेहभेट एवढी विशेष ठरली की या प्रसंगी हे सारे विद्यार्थी खंडोबा यात्रा उत्सवाचे उद्घाटन सोहळा व त्यानिमित्त मंत्री महोदय यांची उपस्थितिचा जल्लोष असल्यावर सुद्धा ही माझी विद्यार्थी म्युन्सिपल हायस्कूलमध्ये सुदामा स्नेह भेटीचा जल्लोष करण्यात मग्न होते तब्बल तीन तास चाललेल्या या स्नेह भेटीत शाळेच्या खोली क्रमांक ६ मध्ये या साऱ्या विद्यार्थ्यांनी कधी नव्हत बाकावर बसून आचर्यचकित आनंद विस्मरला याप्रसंगी वर्ग शिक्षकांच्या नकला, गाण्यांच्या भेंड्या तर गोविंदा मोरे याने सलामत रहे दोस्ताना हमारा हे गीत सादर करून वर्ग मित्रांन प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या यास सर्वांनी बाक वाजवून दाद दिली तदनंतर अल्पोपहार व चहा पाण्याचा आनंद घेतला यावेळी अनुपस्थित असलेले मित्रांना फोन वरून व्हिडीओ कॉल द्वारा संपर्क साधण्यात आला व दिवाळी सुट्टीतील 18 नोव्हेंबर 2020 रोजी या सर्व वर्ग मित्रांचा सहपरिवार स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.

नंतर शाळेच्या आवारा सह इमारतीची पाहणी करत हा माझा वर्ग, इथे आम्ही असे खेळ खेळायचो, हा मोठा खोडकर होता, हे शिक्षक शिक्षा करायचे शाळेतल्या सर्व चांगल्या-वाईट आठवणींना उजाळा मिळाला पाचवीचे वर्ग शिक्षक ए ई ठोंबरे ,पी जे राजपूत सर या शिक्षकांच्या घरी जाऊन भेटी घेऊन त्यांच्याप्रती ऋण व्यक्त केले, संध्याकाळी सर्व मित्रांनी हॉटेल्स मध्ये सामूहिक जेवणाचा आनंद लुटला व पुुन्हा भेटूया 18 नोव्हेंबरला अलविदा म्हणत आपल्या संसार प्रपंच यासाठी रवाना झाले

माझी शाळा माझे मित्र १९८२ व्हाट्सप ग्रुप मुळे शक्य

या सर्व माजी विद्यार्थ्यांचा ललित महाजन डोंबिवली यांनी माझी शाळा माझे मित्र 1982 नावाचा व्हाट्सअप ग्रुप तयार केल्यामुळेच आजचा हा आनंदाच्या डोही आनंद तरंग असाच स्नेह भेटीचा सोहळा पार पडला येत्या दिवाळी सुट्टीतील 18 नोव्हेंबर 2020 रोजी मुन्सिपल हायस्कूल फैजपूर येथे या माजी मित्र सहपरिवार आचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे याप्रसंगी सर्व वर्ग मित्रांनी आपल्यासह परिवारासह उपस्थित राहण्याचे जाहीर आव्हान आयोजकांनी केले आहे.

याप्रसंगी डॉ राजेंद्र नारायण पाटील जळगाव, प्राचार्य डॉ अजय सोमा कोल्हे फैजपूर ,प्राध्यापक डॉ पद्माकर ज्ञानदेव पाटील फैजपूर, ललित हिरामन महाजन डोंबिवली, लक्ष्मीकांत सिताराम बोरोले पनवेल, विलास छगन बोरोले पुणे, मुख्याधापक मुमराबाद अविनाश पितांबर मोरे ,रामा बाबुराव मोरे, गिरीश प्रल्हाद सराफ ,जितेंद्र दुलीचंद नेमाडे,रवींद्र गंगाधर महाजन, जळगाव, राजेंद्र हरी चौधरी ,सुभाष पितांबर चौधरी ,हितेंद्र मधुकर गुजराथी ,वसंत अमरसिंह परदेशी, शशिकांत आत्माराम ठोंबरे ,संतोष मनीराम मेढे, संजय रवींद्र सराफ आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button