Amalner

‘कोरोनाच्या’ धास्तीने शिरूड येथे गावप्रवेश रस्ता बंद! गावातील तरुण सज्ज..तपासणी तसेच ग्रामस्थांच्या परवानगी शिवाय प्रवेश नाही

‘कोरोनाच्या’ धास्तीने गावप्रवेश रस्ता बंद…
गावातील तरुण सज्ज…
तपासणी तसेच ग्रामस्थांच्या परवानगी शिवाय प्रवेश नाही ..

रजनीकांत पाटील
अमळनेर : शिरूड कोरोनाची धास्ती आता ग्रामीण भागात खेड्यांपर्यंत पाहोचली आहे.
गावाच्या बाहेर लाकडी बांबू तसेच लोखंडी पाईप च्या सहाय्याने ट्रॅक्टरला ला बांधून प्रवेश बंद केला आहे.
परवानगी शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. असे गावकऱ्यांनी सांगितले दिवसेंदिवस कोरोना व्हायरस चा प्रभाव चालला असून सध्याची स्थिती त्याचा प्रभाव केवळ शहरात दिसून येत आहे. भविष्यात ग्रामीण भागात त्याची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे गावकऱ्यांनी खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे. कोरोनाच्या विषाणू चा प्रसार होऊ नये. या साठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.
शहराकडून आलेल्यानबद्दल खेड्यातील लोकांत संशयास्पद वातावरण गावांतील काहींनी रोजगाराच्या आशेने नोकरी, उद्योग विविध कारणांमुळे गाव सोडले आहे. पुणे,मुंबई, गुजरात यांसारख्या भागात आपले उदरनिर्वाह करत आहे. मात्र कोरोनामुळे शहरात राहणे कठीण झाल्याने आपल्या लोक गावाकडे परतायला लागले आहेत. शहराकडून गावाकडे येणाऱ्या व्यक्तीकडे लोक संशयास्पद बघू लागले आहेत.गावातील तरुण पिढी जागृत झाली आहे आणि त्यांनी गावात येणाऱ्या बाहेरील व्यक्तींवर लक्ष ठेवून आपला खारीचा वाटा सामाजिक कार्यासाठी एकत्रित पणे देत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button