Chopda

चोपड्यात शेकडो दिवे लावून शहिदांना अभिवादन…चोपडा नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम… कार्यक्रमात निवृत्त जवानांसह हजारों नागरिकांची उपस्थिती

चोपड्यात शेकडो दिवे लावून शहिदांना अभिवादन…चोपडा नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम… कार्यक्रमात निवृत्त जवानांसह हजारों नागरिकांची उपस्थिती

चोपडा
देशाच्या सीमेपासून ते आंतरिक सुरक्षेसाठी स्वत: च्या जिवाची आहुती देणाऱ्या शहीद वीर जवानांच्या शौर्यास नमन व २६ /११ च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दि.२६ रोजी शहरातील कारगिल चौकात संध्याकाळी ६ वाजता शेकडो दिवे लावून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी तालुक्यातील नागलवाडी येथील शहीद वीर जवान नाना सैदाणे यांना त्यांच्या पत्नी नीताताई सैदाणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून शपथ देण्यात आली.त्यानंतर चोपडा नगरपालिकेच्या वसुंधरा अभियानासाठी एक झाड वसुंधरेसाठी ही शपथ देण्यात आली.चोपडा पालिकेच्या माध्यमातून नियोजित असलेल्या कारगिल चौकाच्या संकल्प चित्राचे अनावरण शहीद वीर जवान नाना सैदाणे पत्नी नीताताई सैदाणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तालुक्यातील सेवा निवृत्त सैनिकांना तालुक्यातील नागरिकांकडून सामूहिकरित्या सलामी देण्यात आली.
कार्यक्रमाच्या वेळी नियोजित कारगिल चौकाचे संकल्प चित्राचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.यावेळी नियोजित कारगिल चौक कसे असणार आहे याबाबत सविस्तर माहिती मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी दिली.

संकल्पना नगरपालिकेची आहे परंतु संकल्प आपण सर्व करू या — प्रा.अरुणभाई गुजराथी संविधान दिन आणि शहिद दिवसाच्या भव्यदिव्य कार्यक्रम घेण्याची संकल्पना नगरपालिकेची असली तरी संकल्प आपण सर्व करू या की देशाला आपण काय समर्पित करू शकतो देशावर मोठे संकट आहे ते म्हणजे देशाअर्गत दहशतवाद आणि सीमे बाहेरील दहशतवाद ह्यांचे नायनाट करण्यासाठी आपल्या सारख्याना समपर्णची भावना जागृत व्हायला हवी तशी भावना,विचार, स्फूर्ती अश्या कार्यक्रमातून येत असते. कारगिल चौकाचे सुशोभीकरण करण्याचा मानस संविधान दिन आणि शहिद दिवसाचे औचित्य साधून केले आहे त्यामुळे नक्कीच विशेष राहील असे मी ठामपणे सांगू शकतो.

निवृत्त जवान गोपाळ सोनवणे —- नगरपालिकेने शहीद दिवसाला शहरात इतका भव्यदिव्य कार्यक्रम घेऊन आम्हा सर्व जवानांना सलामी दिली आहे ह्या कार्यक्रमाचे सर्व व्हिडीओ शूटिंग आम्ही सर्व जवान सीमेवरील जवानांना मोबाईल द्वारे पाठवू आणि अजून त्याचे मनोबल वाढवू असा कार्यक्रम चोपडा शहरात कधी झालेला नाही आम्हा जवानांना बोलवुन जो मान दिला त्यांचे ऋणी राहू असे निवृत्त जवान गोपाळ सोनवणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार लताताई सोनवणे,माजी जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील,नगराध्यक्षा मनीषा चौधरी,जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी,चोसाका चेअरमन अतुल ठाकरे,जि प माजी अध्यक्ष गोरख पाटील,जगन्नाथ पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले,शहर पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण,पालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, गटविकास अधिकारी बी एस कोसोदे,बाजार समिती सभापती दिनकर देशमुख,उद्योजक सुनील जैन,शेतकी संघ चेअरमन दुर्गादास पाटील,प स सभापती कल्पना पाटील,पालिकेचे गटनेते जीवन चौधरी,नगरसेवक हितेंद्र देशमुख,रमेश शिंदे,कैलास सोनवणे,अशोक बाविस्कर,गटनेते महेंद्र धनगर,नगरसेविका संध्या महाजन,दीपाली चौधरी,अश्विनी गुजराथी,गिरीश पाटील, माजी उपसभापती नंदकिशोर पाटील, माजी जि. प.सद्स्य बाळासाहेब पाटील, कृती समितीचे एस बी पाटील,राष्ट्रवादी शहराध्यक्ष श्याम परदेशी, नंदकिशोर पाटील,प्रफुल्ल स्वामी, नोमान काझी, विकास शिर्के, सनी सचदेव, प्रफुल्ल पाटील, सह शेकडो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राधेश्याम पाटील तर आभार प्रदर्शन चंद्रहासभाई गुजराथी,यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button