Nandurbar

Crime: निजामपूर येथे मुलीची छेडण्याचा कारणावरून जाब विचारल्याने एकाचा निर्घुण खून व दोन गंभीर.

निजामपूर येथे मुलीची छेडण्याचा कारणावरून जाब विचारल्याने एकाचा निर्घुण खून व दोन गंभीर.

प्रतिनिधी/फहिम शेख

आज दिनांक 17 जुलाई 2022 रविवार रोजी संध्याकाळी निजामपुर तालुका साक्री येथे मुली छेडण्याचा कारणावरून बोलण्यास गेलेले नातेवाईकांना घातक हत्याराने बेदम मारहाण करण्यात आली असून त्यात एकाला रुग्णालयात घेऊन जात असतांना रस्त्यात एकाचे मृत्यु झाली असून दोन गंभीर इसमांना नंदुरबार येथे जिल्हा रुगणाल्यात हलवले असून एकावर निजामपूर येथेच उपचार सुरू आहे. नंदुरबार येथे आणलेल्या दोघा जखमींना पाहण्यासाठी नंदुरबार येथील नातेवाईक, राजकीय व सामाजिक नेते तसेच नागरिकांची एकच गर्दी झाली असून नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी, एल सी बी पी आय, इतर वरिष्ठ अधिकारी व शहर पोलिसचा फौज फाटा जिल्हा रुगणाल्यात दाखल झाला असुन परिस्तिथिवर नजर ठेवुन आहे. तसेच निजामपूर येथे म्रुतक मुनाफ मणियार यांचे शव पोलीस स्टेशनच्या आवारातच नातेवाईक व नागरिकांनी ठेवले असून जो पर्यंत सर्व मारेकर्यान्ना पोलीस अटक करत नाही तोपर्यंत शव उचलणार नाही अशी भूमिका गावकारांनी घेतली असून निजामपूर पोलीस ठाण्यात नाशिक परिक्षेत्राचे आय जी, धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटना स्थळी दाखल झाले असून गुन्हा नोंदणे व आरोपी आणण्याचे कामाला पोलीस यंत्रणा कडून वेग आले आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल दोन्ही जखमींना पाहण्यासाठी एम आय एमचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सैय्यद रफअत हुसैन व त्यांची संपूर्ण टीम त्वरित रुग्णालयात पोहचवून धुळे शहराचे आमदार डॉ. फारूक शाह साहेब यांच्याशी फोनवर बोलणा करून सर्व हकीकत सांगितली असता धुळे पोलीस अधीक्षकशी फोनवर विचारणा करून योग्य व कडक कारवाई करण्यास सांगितले. रफअत हुसैन व आमदार डॉ. फारूक शाह हे परिस्तिथीवर नजर ठेवत असून नागरिकांना शांततेच्या आव्हान केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button