Mumbai

परकीय नागरीक कायदा व संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदयाचे उल्लंघन करणा-या २१ परदेशी व ४ भारतीय नागरीकाना गु्हे शाखा,धटक- 9,ठाणे कहून अटक

परकीय नागरीक कायदा व संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदयाचे उल्लंघन करणा-या २१ परदेशी व ४ भारतीय नागरीकाना गु्हे शाखा,धटक- 9,ठाणे कहून अटक

पी व्ही आंनद

दिनांक-०१/०४/२०२० रोजी मुंग्रा येथील तन्चीर उलुम मदरसा ट्रट, अलमास कॉलनी, कौसा, मुंबरा, ठाणे व अलनदीउल फलाह, सिमला पार्क, कौसा, मुंद्रा, ठाणे या टिकाणी २१ परदेशी व ४ स्थानिक नागरीक मिळुन आले होते. सदर नागरीक हे दिल्ली निजामउददीन येथे झालेल्या मरकज कार्यक्रमास हजर राहून आल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यांना ताब्यात घेवून दोरती, शिळडायघर, ठाणे
येथील विलीगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

सदर परदेशी नागरीकांचा भारत देशात पर्यटन व्हिजा मंजुर असताना ते तबलीकी किंवा जमाती धार्मिक कार्यकमात सामील होवून पर्यटन व्हिसातील दिलेल्या अटी व शर्थीचे उल्लंघन करुन कोरोना विषाणू संसर्गजन्य रोग पसरु नये या करीता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा १८९७ लागू असताना त्यांचे पासून जिवीतास थोकादायक असलेल्या कोरोना रोगाचा
संसर्ग पसरविण्याचा संभव असल्याची माहिती असताना दिल्ली येथून मुंब्रा, जिल्हा- ठाणे येथे येवून हयगयीची व घातकीपणाची कृती केली तसेच सार्वजनिक जागेत बेकायदेशीररित्या ५ पेक्षा अधिक लोक एकत्र जमले होते.

१) मुंब्रा पो.स्टे. गु.र.नं. ३४७/२०२०, भा.द.वि.कलम – 9८८, २६९, २७०, सह परकीय नागरीक अधिनियम १९४६ चे कलम ७(अ),१४, सह संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा १८९७ चे कलम ३ सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ अन्वये दिनांक-०१/०४/२०२०. रोजी दाखल
गुन्हयात १३ बांगलादेशीय नागरीक, त्यांना मदत करणारे इतर स्थानिक नागरीक यांचे विरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला.

२) मुंब्रा पो.स्टे. गु.र.नं. ३४८/२०२०, भा.द.वि.कलम- १८८, २६९, २७०, सह परकीय नागरीक अधिनियम १९४६ चे कलम ७(अ),१४, सह संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा १८९७ चे कलम ३ सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ अन्वये दिनांक-०२/०४/२०२० रोजी दाखल गुन्हयात ०८ मलेशीयन नागरीक, व त्यांना मदत करणारे इतर स्थानिक नागरीक यांचे विरुध्द् गुन्हा दाखल
करण्यात आला.

वरील २१ परदेशी (१३ बांगलादेशी नागरीक व ८ मलेशीयन नागरीक) व ४ स्थानिकांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्याने त्यांना दिनांक-२३/०४/२०२० रोजी दोस्ती, शिळ डायघर, ठाणे येथील विलीगीकरण कक्षातून ताव्यात घेवून त्यांना वरील गुन्हयांमध्ये अटक करण्यात आले.

त्यांना मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली व तद्नंतर जामीनावर मुक्त केले आहे. त्यांना भारत देश सोडप्यास मनाई करण्यात आली आहे.
सदरची सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा, घटक- १, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक समीर अहिरराव हे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button