Maharashtra

२ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क लावताय? काळजी घ्या

२ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क लावताय? काळजी घ्या

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. तर कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना धोकादायक ठरणार असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत.

यादरम्यान लहान मुलांना लस दिली जाणार का? तसेच दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क लावायचा का हादेखील प्रश्‍न अनेकांना पडतो.

यावर अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अंड प्रिव्हेंशनने संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर राखणे हे चांगले असल्याचे संगितले आहे. मात्र २ वर्षाखालील मुलांना मास्क लावल्याने त्यांना गुदमरल्यासारखे होऊ शकते.

लहान मुलांचा श्वसननळीचा मार्ग अरुंद असतो, यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.आणि मास्क लावल्याने त्यांना श्वास घेण्यास जोर लावावा लागतो.

बाल आरोग्य संघटनेने एक सल्ला जारी केला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की 2 वर्षांखालील मुलांनी मास्क घालू नये. तज्ञांच्या मते, मुलांच्या श्वसनाचे वायुमार्ग खूपच लहान असतात, ज्यामुळे त्यांना श्वास घेण्यास अडचण येते.

आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी लेट्सअप घेत नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button