कोरोना मयत व्यक्तींचा अंतिम विधी पार पाडण्यासाठी रावेर तालुक्यातील अनेक तरुण पुढे सरसावले…
खिर्डी ता.रावेर : आज दि.१९रोजी सकाळी रावेर येथे एका कोविडने मृत झालेल्या वृद्ध परिचित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी कोणीही जवळचा नातेवाईक नसल्याने युवा रसिक मंडळ,निंभोरा ता.रावेर यांच्या माध्यमातून आम्ही पुढाकार घेतला.यावेळी सुनील कोंडे , डॉ एस डी चौधरी व श्री धीरज भंगाळे हर्षल ठाकरे
यांसह रावेर येथील दोन सहकारी यांनी मिळून अंत्यसंस्कार पूर्ण केले.खरे तर समाजात अशावेळी तरुणांनी सुरक्षित साधनांचा वापर करून पुढाकार घेणे गरजेचे आहे. असे जाहीर आवाहन निंभोरा येथील जागरूक तरुणींनी केले होते, याला पाठिंबा देत रावेर तालुक्यातील पत्रकार मोरेश्वर सुरवाडे यांनी हे आव्हान सोशल मीडिया गुप वर प्रगट करू शेअर्स केलं, याला प्रतिसाद देत रावेर तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते हे पुढे सरसावले आहेत ती तरुणांची नावे पुढीलप्रमाणे प्रदिप महाराज पंजाबी खिर्डी,धिरज भंगाळे निंभोरा बु
,हर्षल मंगला नामदेव ठाकरे निंभोरा बु,डॉ.एस.डी. चौधरी निंभोरा बु सुनील कोंडे निंभोरा बु
,राज खाटिक निंभोरा बु, शेख इद्रीस खिर्डी खुर्द ,मोरेश्वर सुरवाडे, रावेर विलास ताठे कुंभारखेडा, भिमराव कोचूरे,खिर्डी खु, महेंद्र पाटील गौरखेडा,अजित हबीब तडवी- फैजपूर, चंद्रकांत भंगाळे,चिनावल, प्रदीप वैद्य,सर
यांची नावे आहेत, सदर कोरोना ग्रस्त मृतदेहाचा अंतिम संस्कार विधी करण्यासाठी संबंधितांनी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.






