Nashik

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर फिल्डवर काम करणाऱ्या नाशिकमधील पत्रकारांची होणार कोरोना तपासणी…

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर फिल्डवर काम करणाऱ्या नाशिकमधील पत्रकारांची होणार कोरोना तपासणी…

नाशिकमधील पत्रकारांची तपासणी करण्यासाठी तपासणी कॅम्प घेण्याचे ना. छगन भुजबळांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

सुनिल घुमरे

जगभरासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्यातील जनतेला कोरोनाशी संबंधित बातम्या देणाऱ्या चेन्नई तही त्याप्रमाणे मुंबईतील ५३ पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी फिल्डवर काम करणाऱ्या नाशिकमधील पत्रकारांची देखील तातडीने तपासणी करण्यात यावी यासाठी विशेष तपासणी कॅम्प घ्यावा असे आदेश नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना दिले आहे. आज ना.छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधुन तपासणी कॅम्प घेण्याचे आदेश दिले आहे.

राज्यात कोरोनाच्या संकटाची चाहूल लागल्यापासून काही माध्यमातील पत्रकार प्रत्यक्ष फिल्डवर आपले कर्तव्य बजावतानाआहे.खबरदारी म्हणून मुंबईतील फिल्डवर काम करणारे पत्रकार,फोटोग्राफर,व्हिडिओग्राफर यांची राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्यावतीने कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. विविध माध्यमात कार्यरत असणा-या एकूण १६७ पत्रकारांची गेल्या गुरूवारी कोरोना चाचणी करण्यात आली.त्यातील५३ पत्रकारांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.
याच पार्श्वभूमीवर नाशिमध्ये फिल्डवर काम करणारे पत्रकार, छायाचित्रकार, व्हिडीओग्राफर यांच्यासाठी तातडीने विशेष तपासणी कॅम्प घेऊन सर्वांची तपासणी करण्यात यावी अशा सूचनानासिकचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना केल्या आहेत. त्यानुसार लवकरच पत्रकारांसाठी तपासणी कॅम्प घेतला जाणार आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button