Amalner

Amalner: चोऱ्यांचे सत्र: एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी..! ताला तोडा पर चुराया कूछ नहीं..!

Amalner: चोऱ्यांचे सत्र: एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी..!

अमळनेर शहरात एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी झाल्याने खळबळ उडाली असून चोऱ्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे.याबाबत पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.आता पुन्हा शहरात संत सखाराम महाराज यात्रा भरणार असून येथून पुढे चोऱ्यांचे प्रमाण वाढू शकते.या अनुषंगाने पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी अशी मागणी होत आहे.

दोन ठिकाणी झालेल्या चोरीत मुंदडा नगर एक जवळील कस्तुराबाग व सोनार नगर येथील भागात दिनांक 28 रोजी रात्री घरफोड्या झाल्या.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, कस्तुराबाग येथील रहिवासी नितेश रोहिदास पाटील (एस टी वाहक ) यांच्या घराच्या कडी कोंडा तोडून चोरांनी कपाटातील कापडे असताव्यस्त केले केले आहे. मात्र रोकड, सोने काहीही चोरीला गेले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याच घराच्या बाजूलाच लावन्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेरेत चोरकैद झाले आहेत. हे रात्री 3.45 वाजता (पावणे चार) घराचे कडी कोंडा तोडून घरातील साहित्याचे नुकसान केले.

तर सोनारनगर येथील श्रीमती कल्पना सूर्यवंशी यांच्याही घराचे कडी कोंडा तोडले मात्र काहीही चोरी न झाल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button