Amalner

Amalner: तोंड बांधले रे पण बुट नाही लपवू शकला..!

Amalner: तोंड बांधले रे पण बुटाच काय..?

अमळनेर येथे पिस्तुल दाखवून डांगर शिवारतील पेट्रोलपंपवर तिघांना लुटणाऱ्या आरोपीचा बुटावरून शोध लावून त्याच्या साथीदारासह अटक करण्यात अमळनेर पोलिसांना यश आले आहे.

दि. २४ रोजी पहाटे सव्वा बारा वाजता तोंडाला काळा रुमाल बांधून डांगर शिवारतील पांडुरंग पेट्रोल पंपावर एकाने पिस्तुल दाखवत पंपावरील कर्मचाऱ्यांना उठवून किशोर रवींद्र पाटील यांच्याकडून १४ हजार ३०० , नरेंद्र सोनसिंग पवार यांच्याकडून १३ हजार २०० रुपये आणि त्याचवेळी डिझेल भरायला आलेल्या संजय दिलीप भामरे यांच्या गाडीला ठोसे मारून त्यांच्याकडून ९ हजार रुपये लुटून त्याच्या दुसऱ्या साथीदारासोबत मोटरसायकलने धुळ्याकडे फरार झाले होते. पिस्तुल धारक आरोपी पंपाच्या सीसीटीव्ही मध्ये दिसून आला होता.आरोपी नवखा असल्याने त्याची ओळख पटणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पंपावरचे फुटेज निरखून पाहिले असता त्यांना आरोपीचे बूट पांढऱ्या रंगाचे आणि वेगळे असल्याचे जाणवले. त्यांनी शोध (डीबी) पथकातील रवी पाटील आणि दीपक माळी याना विविध बियर बार आणि दारूचे दुकाने तपासन्याचे आदेश दिले. दोन्ही पोलिसांनी तपासण्या केल्या असता वर्णनाची दहा तरुण पोलिसांच्या डोळ्यासमोर आल्यानन्तरही आरोपी ओळख पटत नव्हती. अखेर बुटांवरून सदरचा आरोपी बियर बार मध्ये येऊन गेला व तो गलवाडे रस्त्याकडे गेला असून परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्या बुटांवरून खात्री होताच त्याला पोलिसी झटका दाखवला तो रईस शेख उस्मान वय ४० राहणार आळंद ता फुलंब्री जिल्हा संभाजीनगर असून तो आपल्या बहिणीकडे बंगाली फाईल मध्ये वेगळी खोली करून राहत होता. गल्लीत वर्दीवर वाहन चालक असल्याचे त्याने सांगितले. त्याला त्याच्याच गावाचा साथीदार आरिफ अहमद शेख वय ३५ रा आळंद ता फुलंब्री याने मोटरसायकलवर पंपापासून पळून गेले होते. पोलिसांनी त्यालाही हुडकून काढून अटक केली. पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे व कॉन्स्टेबल योगेश महाजन यांनी आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्या स्वाती जोंधळे यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button