डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क सुशोभीकरणाचे काम तात्काळ सुरू करण्याचे साकडे
राज्य मंत्री मा संजय बनसोडे यांचे कडे भीम आर्मी ने केली मागणी
लातूर:–लक्ष्मण कांबळे
गेल्या दहा वर्षांपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील सुशोभिकरणासाठी समाजातील विविध संघटने ने निवेदने आंदोलने करून सुशोभिकरणाची मागणि केली परंतू म.न.पा असेल अथवा इथले प्रस्थापित नेते मंडळी असतील जाणिव पुर्वंक डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क छञपती शाहू महाराज या महापुरूषांच्या कामाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत स्व.विलासराव देशमुख साहेब यांचे जागोजागी पुतळे येथिल सुशोभिकरण पाहून आंबेडकरी जनतेला समजून जाईल की महापुरूषांच्या नावावालाच कशा पध्दतीने जाणिवपुर्वंक दुर्लक्ष केले जाते दि 24 – 06- 2020 या रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क सुशोभिकरणाचे काम तात्काळ चालू करण्यात यावी या मागणीचे निवेदन आज लातूरचे राज्यमंत्री मा.सजंय बनसोडे साहेब व लातूर म.न.पा.महापौर विक्रांत गोजमगुंडे साहेब व उप महापौर चंद्रकांत बिराजदार साहेब यांना देण्यात आले येत्या 30 तारखेपर्यंत जर सुशोभिकरणाच्या कामाला सुरूवात नाही झाली तर दि 01-07-2020 या रोजी भिम आर्मी च्या वतिने आत्मदहनाचा इशारा दिला यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे साहेबांनी विविध विषयांवर चर्चा करून कामाला सुरूवात करण्यात येईल असे सांगितले पण आम्हाला आश्वासन नाही तर काम पाहिजे या जिद्दीवर आम्ही ठाम आहोत यावेळी निवेदन देताना भिम आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे जिल्हा प्रमुख विलास चक्रे शहर अध्यक्ष बबलू शिंदे उप शहर अध्यक्ष बबलू गवळे प्रसाद ढगे व अन्य सहकारी






