Amalner

Amalner:युवकांच्या कॉर्नर बैठका.. पोलिसांचा स्तुत्य उपक्रम..!

Amalner:युवकांच्या कॉर्नर बैठका.. पोलिसांचा स्तुत्य उपक्रम..!

अमळनेर शहरात नुकत्याच झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीच्या पार्श्वभूमीवर
अमळनेरला बुधवारी संध्याकाळी कसाली, डीपी मोहल्ला, माळीवाड, आखाडा मकान भाग येथे पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी स्वतः व अधिनस्त अधिकारी उपनिरीक्षक अनिल भुसारे व नरसिंह वाघ, सहाय्यक उपनिरीक्षक विलास पाटील, पोना शरद पाटील, दीपक माळी, रविंद्र पाटील, सिद्धांत सिसोदे, योगेश महाजन, कैलास शिंदे, श्रीराम पाटील, अमोल पाटील, चालक मधुकर पाटील यांनी कॉर्नर सभा घेतल्या. या सभांना ८० ते १०० तरुण मुले उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा केली. योग्य त्या सूचना दिल्या व मार्गदर्शन केले.

हिंदू-मुस्लिम बाबतची मनातली तेढ व तीव्र विरोधाची भावना कशी कमी होईल यावर लक्ष दिले. सोशल मीडिया वर कोणतेही चुकीचे मॅसेज किंवा व्हिडीओ शेयर अथवा व्हायरल करू नये, कोणतीही चुकीची घटना होत असल्यास त्याची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी, कोणीही चुकीची अफवा पसरविणार नाही,अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये यासंदर्भात सूचना दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button